एक्स्प्लोर
Advertisement
VIDEO : कपाटाखाली अडकलेल्या भावाला वाचवणारा 2 वर्षांचा चिमुकला
मुंबई : दिवसभर कामानिमित्त बाहेर असल्यामुळे अनेकांना आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला तसा कमी वेळ मिळतो... पण एक घटना पाहून आपल्या खेळणाऱ्या चिमुकल्यांकडे लक्ष देणं किती महत्वाचं आहे याची कल्पना आपल्याला येऊ शकेल.
फेसबुकवर फिरणाऱ्या एका व्हिडीओने गेल्या दोन दिवसात जगभरातल्या पालकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. ब्रॉवडी आणि ब्रॉक दोन लहानगे बेडरूममध्ये खेळत होते... खेळता खेळता समोरच्या कपाटावर चढायची त्यांनी तयारी केली...
उंची पोहोचत नव्हती पण त्यांनी प्रयत्न चालू ठेवले... शेवटी कपाटावर चढणार... इतक्यात कपाट एका बाजूला झुकलं आणि त्या दोघांच्याही अंगावर कोसळलं....
दोघेही कपाटाखाली अडकले पण ब्रॉवडीने कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली... ब्रॉक तसाच कपाटाखाली अडकून पडला... कपाट अत्यंत जड असल्याने त्याला बाहेर पडणं मुश्कील झालं... तो तिथेच विव्हळत राहिला...
ब्रॉवडीने ब्रॉकला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले पण त्या चिमुरड्याच्या ताकदीपुढे काहीही चाललं नाही... काय घडलंय काही कळत नव्हतं.. त्यात रडणाऱ्या ब्रॉवडीच्या आवाजाने ब्रॉकही सैरभैर होत होता... त्याने एकदा कपाटावर चढून पाहिलं पण त्याच्या वजनामुळे अडकलेल्या ब्रॉकवर अजूनच भार पडला...
शेवटी सगळी ताकद एकवटून ब्रॉवडीने कपाट ढकलायला सुरूवात केली... तळमळत पडलेल्या ब्रॉकनेही स्वत: ला बाहेर काढायचा प्रयत्न केला... आणि अखेर... त्या दोघांनी मिळून कपाट बाजूला सारलं....
आपल्या मुलांसोबत घडलेल्या अपघाताची त्यांच्या आईवडिलांना कल्पनाही नव्हती... मात्र घरातलं सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर त्यांना जबर हादरा बसला.... आणि त्यांनी हा व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केला...
अमेरिकेत फर्निचर अंगावर पडून जखमी होणाऱ्या मुलांची संख्या तब्बल 25,000 च्या घरात आहे... त्या मुलांपैकी दर दोन आठवड्याला एकाचा मृत्यू होतो...
10 मिनीटांत घडलेल्या या अपघाताने होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागला नसता... पण दैव बलवत्तर....!
ब्रॉवडी सारख्या लहानग्या हिरोने आपल्या जुळ्या भावाला मरणाच्या दारातून बाहेर आणलं... त्यामुळे गजबजलेल्या आयुष्यात आपलं आपल्या मुलांकडे लक्ष आहे का याचा विचार करायला हवा...
पाहा संपूर्ण व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
आरोग्य
Advertisement