(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Fine On Twitter: यूजर्सच्या गोपनीयतेचा केला भंग, ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड
Fine On Twitter: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपल्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे.
Fine On Twitter: मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर आपल्या वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. ट्विटरवर दंड ठोठावण्याबरोबरच कंपनीला त्यांच्या वापरकर्त्यांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी मानके तयार करण्याच्या कठोर सूचनाही देण्यात आल्या आहेत.
अमेरिकेतील डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि फेडरल ट्रेड कमिशनने (US Department of Justice and Federal Trade Commission) ट्विटरसह सेटलमेंटची घोषणा केली आहे. या सरकारी संस्थांचा आरोप आहे की, ट्विटरने वापरकर्त्यांना फसवून 2011 च्या FTC आदेशाचे उल्लंघन केला आहे. FTC आदेशानुसार यूजर्सची गोपनीयता सांभाळणे ही संबंधित कंपनीची जबादादरी आहे.
सरकारने आरोप केला आहे की, मे 2013 ते सप्टेंबर 2019 पर्यंत ट्विटरने वापरकर्त्यांना सांगितले की, ते त्यांच्या खात्यांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने त्यांचे फोन नंबर आणि ईमेल आयडीची माहिती घेत आहेत. परंतु कंपनीने युजर्सचा डेटा आणि त्यांचे वैयक्तिक तपशील इतर कंपन्यांसोबत शेअर केला. या डेटाचा वापर करून कंपन्यांनी युजर्सना ऑनलाइन जाहिराती पाठवायला सुरुवात केली.
अमेरिकेतील डिपार्टमेंट ऑफ जस्टिस आणि फेडरल ट्रेड कमिशनने बुधवारी दाखल केलेल्या फेडरल खटल्यात असाही आरोप केला की, ट्विटरने युरोपियन युनियन (The European Union) आणि स्वित्झर्लंडसह (Switzerland) अमेरिकन गोपनीयतेच्या करारांचे (American confidentiality agreements) पालन केल्याचा खोटा दावा केला आहे. या खटल्याच्या निकालानंतर ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला.
ट्विटर डील कधी होणार?
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला ट्विटर करार कधी होणार, असा प्रश्न सर्वाना पडला आहे. यावरच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क यांनी ट्वीट करत सध्या हा करार होल्डवर ठेवला असल्याचं सागितलं होत. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले होते की, ''ट्विटर करार तात्पुरता होल्डवर ठेवण्यात आला आहे. ट्विटरने एका फाइलिंगमध्ये माहिती दिली होती की, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर फक्त 5% स्पॅम/बनावट खाती आहेत. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 22.9 कोटी वापरकर्ते आहेत.'' त्यांच्या या ट्वीटनंतर ट्विटरचे शेअर्स जवळपास 20% घसरले होते. आता इलॉन मस्क आणि ट्विटर यांच्यात व्यवहार होणार की नाही, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.