(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Turkey Earthquake : तुर्कीत भूकंपामुळं आत्तापर्यंत 35 हजार 418 जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती
Turkey Earthquake : तुर्कीत (Turkiye) सोमवारी (6 फेब्रुवारी) झालेल्या भूकंपातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत 35 हजार 418 जणांचा मृत्यू झाला आहे.
Turkey Earthquake Death : तुर्कीत (Turkiye) सोमवारी (6 फेब्रुवारी) झालेल्या भूकंपातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. आतापर्यंत 35 हजार 418 जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती पीटीआय (PTI)या वृत्तसंस्थेनं दिली आहे. दरम्यान, मदतकार्य अतिशय वेगाने सुरु आहे. अद्यापही ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मृत्यूचा आकडा 50 हजारांच्या पुढे जाण्याची भीती
भूकंपामुळं तुर्की आणि सीरियामध्ये (Syria) भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. भूकंपामुळं अनेकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक जखमी झाले आहेत. तुर्कीतील मृतांचा आकडा हा 35 हजार 418 एवढा झाला आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तुर्कीमध्ये 6 फेब्रुवारी 2023 रोजी 7.8 तीव्रतेचा मोठा भूकंप झाला होता. यानंतरही भूकंपाचे अनेक धक्के बसले होते. यामुळं तुर्कीतील दहा शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. सीरियामध्येही हजारो लोकांनी प्राण गमावले आहेत. तुर्की प्रशासन आणि भारतीय जवानांकडून भूंकपग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य राबवलं जातं आहे. दरम्यान, भूकंपामध्ये 50 हजार जणांचा मृत्यू झाल्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.
Turkiye's president announces 35,418 deaths in last week's earthquake, making it country's worst disaster in a century, reports AP
— Press Trust of India (@PTI_News) February 14, 2023
प्रशासनाकडून बचावकार्य सुरु
सध्या प्रशासनाचे बचावकार्य सुरु आहे. ढिगारा हटवला जात असताना अनेक मृतदेह बाहेर काढले जात आहेत. विशेष म्हणजे भूकंपानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या अनेक नागरिकांना सुखरुप बाहेरही काढण्यात आलं आहे. जखमींवर उपचार सुरु आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासोबतच बचावलेल्या नागरिकांना अन्न आणि थंडीपासून संरक्षण देणे, हे सध्या प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे.
भारताचा मदतीचा हात
तुर्कीला भूकंपाच्या हादऱ्यानं उद्ध्वस्त केलं असतानाच भारताकडून तातडीनं मदतीचा हात पुढे करण्यात आला. पंतप्रधान कार्यालयाकडून तुर्कीसाठी मदतीची घोषणा केल्यानंतर लगेचच एनडीआरएफचं पहिलं पथक तुर्कीच्या दिशेनं रवाना झालं. भारतीय वायूदलाच्या विमानातून हे पथक मदतीसह तिथं पोहोचलं. या पथकामध्ये पुरुष आणि महिला स्वयंसेवकांसह डॉग स्क्वाड, प्रथमोपचार सामग्री आणि काही महत्त्वाच्या उपकरणांचाही समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
दोन दिवस आणि पाच मोठे भूकंप.... तुर्कीमध्ये भूकंप का झाला? जाणून घ्या त्यामागचं कारण