Titanic Sink :टायटॅनिक बुडणार हे आधीच लिहिलं गेलं होतं, लिहिणारा मात्र विधाता नव्हता...!!
टाययटॅनिकचा अपघात झाल्यानंतर ज्या लोकांनी ही कादंबरी वाचली, त्यांना ती एक भविष्यवाणी असल्याचं वाटू लागलं.
मुंबई: आपण लहानपणापासून मोठ्या माणसांच्या तोंडून हे ऐकत आलो आहोत की “शेवटी जे लिहलंय तेच होणार...!!” आणि आपल्यालाही ते अनेक प्रसंगी खरं आहे की काय असं वाटतं. जसं जसं आपण मोठे होत जातो, अनुभवांची आपली एक शिदोरी निर्माण होत जाते. मग आपणही तेच म्हणतो कधी कधी.
पण जगातल्या एका मोठ्या घटनेसंदर्भात, नाही नाही दुर्घेटनेसंदर्भात असा एक योगा-योग घडला की आपणही अवाक् व्हाल. टायटॅनिक जहाज समुद्रात कसं सामावलं गेलं हे जगाला माहितीय, भारतातही टायटॅनिक सिनेमा खूप गाजला. टायटॅनिक अॅटलान्टिक समुद्रात बुडालं ते 14 एप्रिल 1992 ला. कधी न बुडू शकणारं जहाज अशी ज्याची ख्याती असेल असं निर्मात्यांनी जाहीर केलं होतं, ते जहाज पहिल्याच प्रवासात दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत पोहोचलं नाही.
पण ही घटना होण्याआधी तब्बल 14 वर्षे मॉर्गन राँबर्टसन या लेखकानं एक कादंबरी लिहिली. त्यामध्ये एका भल्या मोठ्या प्रवासी जहाजाच्या सर्वनाशाचं वर्णन त्यानं लिहिलं. 1978 साली म्हणजे टायटँनिक समुद्राच्य़ा तळाशी काय़मचा विसावा घ्यायच्या आधी तब्बल 14 वर्षे आधी ही कादंबरी त्यानं लिहून ठेवली या काल्पनिक कादंबरीचं नाव होतं “Futility Or The Wreck Of The Titan”.
नावासह काही गोष्टींमध्ये कमाल योगा-योग आहे,
• कादंबरीतल्या जहाजाचं नाव आहे एस. एस. टायटन, खरी जलसमाधी घेतलेलं ते “आर. एम. एस. टायटँनिक”.
• दोन्ही जहाजांचा पहिला प्रवास होता.
• दोन्ही जहाजांचा प्रवास अटलांन्टीक समुद्रात होता.
• कादंबरीतलं टायटनही ब्रिटीश शिप होती टायटँनिकसारखीच दोन्ही न्यूयाँर्ककडे जात होते.
• दोन्ही जहाजांवरती श्रीमंत तथा एलिट क्लास लोकांचा भरणा अधिक होता.
• टायटॅनिकप्रमाणे टायटनचाही सर्वात मोठं आणि कधी न बुडणारं जहाज असा उल्लेख कादंबरीत केला गेला.
• टायटन 800 फूट लांब होतं तर टायटँनिक 882 फूट.
• कादंबरीतलं टायटन 25 नाँटस् तर टायटँनिक 23 नाँटस् वेगानं धावत होतं.
• कादंबरीतल्या टायटनमध्ये 19 वाँटर टाईट कम्पार्टमेंन्ट होती तर टायटँनिकमध्ये 16.
• टायटनमध्ये 24 लाईफ बोटस् होत्या तर टायटँनिकमध्ये 22.
• टायटनमध्ये 3000 तर टायटँनिकमध्ये 2224 यात्री प्रवास करत होते.
• दोन्ही जहाजांवर अनेक गोष्टी सारख्या होत्या जसं की आँर्केस्ट्रा मुख्य भागाचं डिझाईन.
• दोन्ही जहाजं एप्रिल महिन्यातच समुद्रात धाराशाही झाली.
• दोन्ही जहाजं हिमनगाला धडकल्यानंच समुद्रात बुडाली.
• दोन्ही जहाजांवर साऱख्याच लाईफ बोटस् होत्या.
अशा काही जवळपास सारख्या असणाऱ्या बाबी-गोष्टी लोकांना कादंबरी आणि वास्तवात झालेल्या अपघातात आढळल्या.
टायटॅनिकचा अपघात झाल्यानंतर ज्या लोकांनी ही कादंबरी वाचली. त्यांनी त्याकडे एक भविष्यवाणी म्हणून पाहू लागले. माँर्गन राँबर्टसननं मात्र आपण केवळ एक कादंबरी लिहिली असं म्हणत हा केवळ एक योग-योग आहे असं अनेकदा सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या कादंबरीतल्या जहाजाचं नाव टायटन तर वास्तवात अपघात झालेल्या जहाजाचं नाव टायटँनिक आणि बाकीच्या काही गोष्टी जवळपास सारख्याच असल्यानं लोक मात्र मग ही भविष्यवाणीच असल्याचं म्हणू लागले.
परंतु त्याच्या कादंबरीतल्या जहाजाचं नाव टायटन तर वास्तवात अपघात झालेल्या जहाजाचं नाव टायटॅनिक आणि बाकीच्या काही गोष्टी जवळपास सारख्याच असल्यानं लोक मात्र मग ही भविष्यवाणीच असल्याचं म्हणू लागले.
खरं तर माँर्गन राँबर्टसनचे वडील एक शिप कँप्टन होते, त्यानंतर माँर्गननंही एका बोटीवर 10 वर्षे काम केलं होतं. त्यामुळे जहाज, समुद्र, समुद्री प्रवास, आईसबर्ग, जहाजावरची संकटं या सगळ्या गोष्टी मॉर्गनला माहिती होत्या, त्यातूनच ही कादंबरी लिहावी अशी कल्पना त्याच्या मनात आली मग ती लिहली गेली आणि पुढे जाऊन एका कादंबरीचा अध्याय झाला, अशी ही गंमत आहे.
टायटँनिक अपघातानंतर मग पुन्हा एकदा “Futility Or The Wreck Of The Titan”. रिएडीट केली गेली. काही गोष्टींमध्ये बदल केला गेला. नवीन अपघात झालेल्या जहाजाचं नाव टायटॅनिक आणि बाकीच्या काही गोष्टी जवळपास सारख्याच असल्यानं लोक मात्र मग ही भविष्यवाणीच असल्याचं म्हणू लागले.
टायटॅनिकसंदर्भात आणखी एक थीअरी सांगितली जाते की तो जगातला पहिला आतंकवादी हल्ला होता. ते जहाज आईसबर्गला धडकलंच नाही तर स्फोट घडवून बुडवलं गेलं. त्याचा रिसर्च करुन ती स्टोरी मी नक्की आपणापुढे सादर करेन.