एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'टाइम'च्या यादीत मोदींना स्थान नाही, 100 जणांमध्ये 4 भारतीय!
अमेरिकेतील प्रसिद्ध टाइम मासिकानं प्रभावशाली व्यक्तींची यादी घोषित केली आहे.
नवी दिल्ली: जगभरातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्थान देण्यात आलेलं नाही. अमेरिकेतील प्रसिद्ध टाइम मासिकानं प्रभावशाली व्यक्तींची यादी घोषित केली आहे. या यादीत यंदा मोदी स्थान मिळवू शकले नाहीत.
या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे, कॅनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान, चीनचे राष्ट्रपती शी चिनपिंग, उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन, आयर्लंडचे भारतीय वंशाचे पंतप्रधान लियो वराडकर आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या दिग्गज राष्ट्रप्रमुखांचा ‘टाइम’च्या यादीत समावेश आहे.
मात्र या यादीत मोदींना स्थान देण्यात आलेलं नाही.
शंभर जणांमध्ये केवळ चार भारतीय
जागतिक 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत विविध विभागात केवळ चार भारतीयांनीच स्थान मिळवलं आहे. यामध्ये ओला कॅबचे सह संस्थापक भावीश अग्रवाल, अभिनेत्री दीपिका पदुकोण, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि भारतीय वंशाचे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांचा समावेश आहे.
टाइम मासिकातर्फे दरवर्षी जगभरातील 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली जाते.
संबंधित बातम्या
'टाइम'च्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये प्रियंका चोप्रा
'टाईम'च्या इंटरनेटवरील सर्वात प्रभावी 30 व्यक्तिमत्त्वांमध्ये नरेंद्र मोदी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement