Italy Airport Strike: युरोपात हजारो भारतीय प्रवासी अडकले, एअरलाईन्स कर्मचाऱ्यांच्या संपाचा प्रवाशांना फटका
Italy Airport Strike: इटलीमधील एअरलाईन्स कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांना अडचणी निर्माण होत असल्याचं चित्र आहे.
Italy Airport Strike: इटलीमधील (Italy) एअरलाईन्स कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक विमानांचे (Flight) उड्डाण रद्द करण्यात आले आहे. यामुळे हजारो प्रवासी इटलीमध्ये अडकून पडले आहेत. यामध्ये अनेक भारतीय (Indian) प्रवाशांचा देखील समावेश आहे. एकट्या इटलीमध्ये आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय अशी एकूण जवळपास हजार विमानांचे उड्डाण रद्द केले आहे.
इटलीमध्ये सध्या पर्यटकांची रेलचेल आहे. पण कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे पर्यटकांना अडचणी निर्माण झाल्याचं चित्र आहे. संपाशिवाय युरोपात प्रंचड उष्णता आहे. या उष्णतेचा देखील त्रास नागरिकांना होत असल्याचं पाहायला मिळत आहे. युरोपात सध्या 40 डिग्री ते 45 डिग्री अंश सेल्सियस तापमान असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यामध्ये अडकलेल्या भारतीय पर्यटकांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच विमानाचे उड्डाण रद्द झाल्यास किंवा उड्डाणाला विलंब झाल्यास एअरलाइन्सकडूनही फारशी मदत मिळत नसल्याचा दावा पर्यटकांकडून सोशल मिडियाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
तसेच लोकांना नुकसान भरपाई देण्याऐवजी लोकांना किमान पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करुन दिल्या जात आहेत किंवा फक्त 15 युरो परत केले जात असल्याची माहिती प्रवाश्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यामुळे अडकलेल्या भारतीय प्रवशांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसल्याचं सांगण्यात येत आहे.
उन्हाळ्यात आणि पर्यटनाच्या हंगामात इटलीमधील वाहतूक कर्मचारी अनेकदा संप करतात. एअरलाईन्स कर्मचाऱ्यांच्या आधी इटलीमधील रेल्वे कर्मचाऱ्यांनी संप केला होता. इथल्या कामगार संघटनांनी देखील चांगल्या परिस्थितीत काम करण्याचा दबाब निर्माण करण्यासाठी अनेकदा संप करतात.
ट्रेड युनियन्स फाल्ट सीजीआयएल, उइलट्रास्पोर्टी आणि उगल ट्रैस्पोर्टो या संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, Ryanair या विमानांचे उड्डाण करणाऱ्या माल्टा एअरशी झालेल्या करारातील मतभेदांमुळे संप पुकारण्यात आला आहे. तसेच आता या कंपन्यांकडून नवीन करारांची देखील मागणी करण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोममध्ये शनिवारी (15 जुलै) रोजी 200 विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आहे. मिलानच्या विमानतळांवर 150 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर ट्यूरिन आणि पालेर्मोमधील सुद्धा अनेक उड्डाणं रद्द केली आहेत.
विमानाचे पायलट देखील या संपात सहभागी आहेत. त्यामुळे माल्टा एअरच्या अनेक विमानांच्या उड्डाणांवर याचा परिणाम झाला आहे. इटलीच्या परिवहन मंत्र्यांनी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना समजूतीने घेण्याचे आवाहन केले आहे. कारण इतर अनेक कामगार आणि पर्यटकांना यामुळे त्रास होणार नाही.