एक्स्प्लोर
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड हेडलीवर जीवघेणा हल्ला
मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी माफीचा साक्षिदार झालेला हेडली सध्या शिकागोतील तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
वॉशिंग्टन : मुंबईतील 26/11 हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या डेव्हिड कोलमन हेडली याच्यावर अमेरिकेतील तुरुंगात हल्ला झाला आहे. शिकागोतील तुरुंगात त्याच्यावर 8 जुलै रोजी हल्ला झाला.
सध्या हेडलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, त्याची प्रकृती अत्यवस्थ आहे. हेडलीवर 8 जुलैला दोन कैद्यांनी जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला त्यांनी नेमका का केला, हे मात्र अजूनही समजू शकलेलं नाही.
मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी माफीचा साक्षिदार झालेला हेडली सध्या शिकागोतील तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
मुंबई हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत
मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात हेडलीने दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबाचा एजंट म्हणून काम केलं होतं. हेडलीने 2006 आणि 2008 साली अनेकदा भारतात येऊन इथले नकाशे काढले, व्हिडीओ काढले आणि हल्ल्यासाठी ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल आणि नरीमन हाऊस यांची हेरगिरी केली, असा त्याच्यावर आरोप आहे.
मुंबईवरील या दहशतवादी हल्ल्यात 166 निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.
हल्ल्यातील सहभाग मान्य केला
‘पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 26/11 च्या हल्ल्याआधीही मुंबईवर दोनदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात त्यांना यश आलं नाही,’ असं डेव्हिड हेडलीने शिकागोच्या जेलमधून कोर्टाला साक्ष देताना मान्य केलं होतं.
‘मी हाफीज सईदकडून प्रभावित होऊन लष्कर-ए-तोएबामध्ये सामील झालो होतो आणि मी या संघटनेचा कट्टर समर्थक आहे,’ असं डेव्हिड हेडलीने म्हटलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
विश्व
Advertisement