एक्स्प्लोर
पाकिस्तानी विदेशमंत्र्यांच्या वक्तव्याचा सुषमा स्वराज यांच्याकडून समाचार
कुरेशींच्या वक्तव्याने पाकिस्तानची पोलखोल झाली आहे, असे ट्वीटद्वारे सुषमा स्वराज म्हणाल्या. भारत करतारपूर कॉरीडोर मुद्द्यावर इमरान खानच्या गुगलीत अडकला आहे, असे वक्तव्य कुरेशी यांनी केले होते.
नवी दिल्ली : भारताच्या विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांच्या गुगलीवाल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. कुरेशींच्या वक्तव्याने पाकिस्तानची पोलखोल झाली आहे, असे ट्वीटद्वारे सुषमा स्वराज म्हणाल्या. भारत करतारपूर कॉरीडोर मुद्द्यावर इमरान खानच्या गुगलीत अडकला आहे, असे वक्तव्य कुरेशी यांनी केले होते.
कुरेशींच्या या वक्तव्याचा सुषमा स्वराज यांनी ट्वीटरवरुन खरपूस समाचार घेतला आहे. कुरेशींच्या वक्तव्याने पाकिस्तानची पोलखोल झाली आहे. त्यांच्या वक्तव्याने हे स्पष्ट होत आहे की, इमरान खान यांना शिखांच्या भावनेचा आदर नाही, असे ट्वीट स्वराज यांनी केले आहे. तुम्ही फक्त गुगलीच टाका मात्र आम्ही त्यात फसणार नाही. आमचे दोन मंत्री करतारपुरला गेले होते, असेही त्या म्हणाल्या.
सुषमा स्वराज यांना करतारपूर कॉरीडोरच्या कोनशीला अनावरण कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र सुषमा स्वराज यांनी आजाराचे आणि व्यस्त कार्यक्रमाचे कारण सांगून कार्यक्रमाला जाण्यास नकार देत हरसिमरत कौर बादल आणि एच. एस. पुरी या दोन मंत्र्यांना पाठवले होते. या कार्यक्रमासाठी कॉंग्रेसचे नेते नवज्योतसिंह सिध्दू देखील गेले होते.
करतारपूर साहिबचे महत्व
पाकिस्तानच्या नरोवार जिल्ह्यातील करतारपुरमध्ये शिखांचे पवित्र धर्मस्थळ आहे. करतारपुरमध्ये शीख समुदायचे पहिले धर्मगुरू गुरुनानक 18 वर्षे राहिले होते. तसेच या गावातच त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यांची समाधीही करतारपुरमध्येच आहे. पहिल्यांदा लंगरला सुरुवातही येथूनच झाली होती. म्हणून करतारपूर साहिब या धर्मास्थळाला विशेष महत्व प्राप्त आहे. शिवाय हे गाव भारताच्या सीमेपासून 4 किमी लांब आहे.
करतापूर कॉरिडोरचे फायदे
करतारपूर कॉरिडोर झाल्याने शीख समुदायांची 70 वर्षाची प्रतिक्षा संपेल. भारतातील कोट्यावधी शीख बांधवाना गुरुनानक यांच्या समाधीचे दर्शन घेता येईल. शिवाय त्यांना विना व्हिजा पाकिस्तानात प्रवेश असेल. तसेच कॉरीडोर झाल्यास भारत-पाक संबध काही प्रमाणात सुधारण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
क्रिकेट
Advertisement