Sudan Crisis: ऑपरेशन 'कावेरी' सुदानमध्ये अडकलेले 2100 भारतीय सुखरुप परतले! भारत सरकारचं ऑपरेशन कावेरी जोमानं सुरू
सुदानमधील 231 भारतीय नागरिकांना सुखरुप परत घेऊन भारतीय विमान दिल्लीत पोहचले. तर आतापर्यंत 2100 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले असून आतापर्यंत 1600 नागरिक भारतात पोहचले आहेत.
Sudan Crisis:सुदानमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून अंतर्गत यादवी(Sudan Crisis) सुरू आहे. त्यामुळं तिथं वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळं सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र खात्याकडून मायदेशी आणण्यासाठी 'ऑपरेशन कावेरी'(Operation Kaveri) राबवण्यात येत आहे. सूदानची राजधानी खार्तुमसह बऱ्याच ठिकाणी सुरु असलेला हिंसाचार सुदानमधील स्थिती अस्थिर बनवत आहे. भारत सरकारच्या ऑपरेशन कावेरी अंतर्गत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरुप मायदेशी परत आणण्याचे काम सध्या सुरु आहे. याचदरम्यान 231 नागरिकांना सुखरुप परत घेऊन भारतीय वायुसेनाचे विमान नवी दिल्लीत पोहचले. यासंदर्भातली माहिती परराष्ट्रमंत्री डॉ.एस जयशंकर यांनी ट्विट करत दिली आहे.
#OperationKaveri moves further.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) April 29, 2023
231 Indian reach home safely as another flight reaches New Delhi. pic.twitter.com/NLRV0xIZS9
तसेच इंडिगो एअरलाईन कंपनीने देखील म्हंटले की, 'सुदानमधील अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरुप परत आणण्यासाठी भारत सरकारच्या ऑपरेशन कावेरीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.तसेच तसेच आम्ही यांकरिता भारत सरकारला सर्वतोपरी मदत करु''असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, 'आम्ही मानवी सुरक्षेच्या दृष्टीने पुढचं पाऊल उचललं आहे, त्यामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरुप त्यांच्या घरी पोहचवता येईल'.
आतार्यंत 2, 100 भारतीय नागरिक मायदेशी..
भारतीय वायुदलाने 27 आणि 28 एप्रिल रोजी एक साहसी गोष्ट करुन दाखवली. ऑपरेशन कावेरी अंतर्गत वायुसेनेच्या c-120J या विमानाने एका छोट्या हवाईपट्टीत विमान लँड करत 121 भारतीय नागरिकांचे प्राण वाचवले. वायुसेनेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या 121 लोकांमध्ये एका गर्भवती महिलेचा देखील समावेश होता. तसेच गुरुवारी 20 एप्रिल रोजी 135 भारतीय नागरिकांना घेऊन वायुसेनेचे IAF C-130J विमान परतले. तसेच 1600 भारतीय सुखरुप मायदेशी परतत्याची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री वी. मुरलीधरन यांनी ट्विट करत दिली.
Indigo joins #OperationKaveri.
— V. Muraleedharan (@MOS_MEA) April 28, 2023
231 Indians in a flight to New Delhi from Jeddah.
With this 5th outbound flight, around 1600 reached or airborne for India.
Happy journey.
Our Mission continues. pic.twitter.com/5JtBR0sHCF
सुदानमध्ये गेल्या 15 दिवसांपासून लष्करी आणि निमलष्करी दलात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचारात अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. भारत सरकारकडून सुदानमधील भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी 24 एप्रिलपासून ऑपरेशन कावेरी राबवले जात आहे.