एक्स्प्लोर

Sri Lanka Crisis : श्रीलंकेत नागरिकांचा उद्रेक; राजपक्षेंच्या घराला लावली आग, खासदारासह 5 जणांचा मृत्यू, वाचा महत्त्वाचे मुद्दे

Sri Lanka Crisis : श्रीलंकेतील हमताबनटोटा येथील महिंदा राजपक्षे यांच्या वडिलोपार्जित घराला आंदोलकांनी आग लावली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Sri Lanka Crisis : भारताचा शेजारील देश श्रीलंकेमधील आर्थिक संकट आणखी बिकट होत चाललं आहे. यामुळे श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडताना दिसत आहे. आर्थिक संकटामुळे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनााम दिला. मात्र त्यानंतर देशात हिंसाचार उसळला आहे. महागाईने त्रस्त जनता रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहे. इतकंच नाही तर आंदोलकांनी तोडफोड करत हिसांचार सुरु केला आहे. आता आंदोलकांनी राजपक्षे यांच्या घराला आग लावल्याची घटना समोर आली आहे. यासोबतच राजपक्षे यांच्या समर्थकांवरही हल्ले करण्यात येत आहेत.

राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेतील हिंसाचारात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यृ झाला असून सुमारे 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हिंसाचार झालेल्या परिसरात पोलिसांनी कर्फ्यू लागू केला होता. हा कर्फ्यू मंगळवारी सकाळी 7 वाजता उठवण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कोलंबोच्या पश्चिम प्रांतात सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी या भागात कर्फ्यू लावला होता.

श्रीलंकेतील सध्याची परिस्थितीबाबत 10 महत्त्वाचे मुद्दे

1. श्रीलंकेतील हमताबनटोटा येथील महिंदा राजपक्षे यांच्या वडिलोपार्जित घराला आंदोलकांनी आग लावली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्यतिरिक्त काही मंत्र्यांची घरालाही आग लावल्याची आणि तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
2. श्रीलंकेत हिंसाचार भडकल्यानंतर पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिला. हिंसाचारात श्रीलंकेच्या खासदारासह पाच जणांचा मृत्यू झाला असून 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
3. श्रीलंकेतील बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे त्रस्त जनतेकडून गेल्या अनेक आठवड्यांपासून निदर्शनं सुरू होती. जेव्हा सरकारकडे आयातीसाठी निधी संपला तेव्हा मात्र लोक रस्त्यावर उतरले आणि हिंसाचार पसरला. जनतेचा रोष पंतप्रधान राजपक्षे आणि त्यांच्या समर्थकांवर आहे.
4. श्रीलंकेतील सर्व शहरांमध्ये संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हिंसाचार रोखण्यासाठी पोलीस आंदोलकांवर अश्रुधुराचा आणि बळाचा वापर करत आहेत. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं दिसत असून आंदोलकांची संख्याही वाढत चालली आहे.
5. भारताचे श्रीलंकेतील घडामोडींवर बारकाईनं लक्ष आहे. दरम्यान, कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्तांनी भारतीयांना संकटात मदतीसाठी आपत्कालीन मोबाईल क्रमांक +94-773727832 जारी केला आहे. तसेच, श्रीलंकेत उपस्थित असलेल्या भारतीय नागरिकांना कोणत्याही आवश्यक मदतीसाठी cons.colombo@mea.gov.in आणि cons2.colombo@mea.gov.in सोबत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
6. श्रीलंका 1948 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंतच्या सर्वात गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. परकीय चलनाच्या कमतरतेमुळे हे संकट उद्भवलं आहे. यामुळे श्रीलंकेकडे मुख्य अन्नपदार्थ आणि इंधनाच्या आयातीसाठी पैसे नाहीत.
7. खासदाराच्या मृत्यूबाबत पोलिसांनी सांगितले की, श्रीलंकेचे पोदुजाना पेरामुना (SLPP) खासदार अमरकिर्ती अतुकोरा (वय 57 वर्ष) यांना पोलोनारुआ जिल्ह्यातील पश्चिमेकडील नितांबुआ शहरात आंदोलकांनी घेरलं. त्यांच्या कारमधून गोळी झाडण्यात आल्याचा दावा लोकांनी केला आहे. संतप्त जमावाने त्यांना कारमधून बाहेर काढल्यावर त्यांनी पळ काढला आणि एका इमारतीत आश्रय घेतला. यानंतर त्यांनी स्वत:वर गोळा झाडत आत्महत्या केल्याचा दावा लोकांनी केला आहे.
8. माजी मंत्री जॉन्सन फर्नांडो यांच्या कुरुणेगाला आणि कोलंबो येथील कार्यालयांवर संतप्त जमावानं हल्ला केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यांच्या बारला आग लावण्याचीही माहिती समोर आळी आहे. माजी मंत्री निमल लांजा यांच्या निवासस्थानावरही हल्ला करण्यात आला, तर महापौर समनलाल फर्नांडो यांच्या निवासस्थानालाही आग लावण्यात आली आहे.
9. याआधी जनतेला आवाहन करताना अध्यक्ष गोटाबाया म्हणाले की, 'मी जनतेला संयम बाळगण्याचं आवाहन करतो. हिंसाचाराने केवळ अधिक हिंसाचार पसरेल. आर्थिक संकटाचं निराकरण करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत.'
10. दरम्यान, हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकन ​​एअरलाइन्सने प्रवाशांना बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर (BIA) पोहोचण्यासाठी त्यांची तिकिटे आणि पासपोर्ट चेकपॉईंटवर दाखवण्याची विनंती केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेसWorli Hit and Run Case : मासे घेऊन घरी येत असताना पत्नीला उडवलं, हुंदका आवरत पतीचा आक्रोशWorli Hit and Run Accident : वरळी अपघातातील गाडीचं परीक्षण करण्यासाठी RTO टीम दाखलSupriya Sule Meet Asha Pawar | अजित पवारांच्या घरी नाहीतर आशा काकींच्या घरी गेले होते- सुप्रिया सुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
Embed widget