Sri Lanka Crisis: पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर श्रीलंकेत हिंसाचार, सत्ताधारी पक्षाच्या खासदाराचा मृत्यू, अनेकजण जखमी
सत्ताधारी पक्षाच्या अमरकीर्ती अथूकोरला (Amarakeerthi Athukorala) या खासदाराचा श्रीलंकेतील हिंसाचारामध्ये मृत्यू झाला आहे.
कोलंबो: पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर श्रीलंकेत हिंसाचाराला सुरुवात झाली आहे. यामध्ये आता सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे श्रीलंकेचा प्रवास यादवीकडे सुरु झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अमरकीर्ती अथूकोरला असं या मृत्यू झालेल्या खासदाराचं नाव आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षेंनी काहीच वेळापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांचे समर्थक आणि विरोधी पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात हिंसाचारास सुरुवात झाली. या हिंसाचारामध्ये सत्ताधारी पक्षाच्या खासदाराचा मृत्यू झाला आहे, तसेच आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 139जण जखमी झाले आहेत.
#BREAKING Ruling-party MP killed in Sri Lanka clashes: police pic.twitter.com/Ri6umuPWiX
— AFP News Agency (@AFP) May 9, 2022
दरम्यान, श्रीलंकेतील अमेरिकेच्या राजदूतांनी या हिंसाचाराचा निषेध केला आहे. सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकावर सत्ताधारी पक्षाने हल्ला केल्याची घटना दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
#UPDATE Sri Lanka Prime Minister Mahinda Rajapaksa resigned Monday, his spokesman said, shortly after violent clashes between his supporters and anti-government protesters left 78 people wounded pic.twitter.com/29i0yat6OI
— AFP News Agency (@AFP) May 9, 2022
महत्त्वाच्या बातम्या:
- Mahinda Rajapaksa : पंतप्रधान महिंदा राजपक्षेंचा राजीनामा, श्रीलंकेला कर्जाच्या खाईट लोटण्यासाठी चीनी ड्रॅगनचा नवा विळखा
- Mahinda Rajapaksa Resigns: अखेर श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा, अनेक दिवसांपासून सुरू होती निदर्शनं
- Sri Lanka : पोर्ट सिटी आणि चीनचा कुटील डाव; हंबनटोटानंतर आता ड्रॅगन संपूर्ण लंकाच गिळंकृत करणार?