एक्स्प्लोर

Diogo Alves : गेली 181 वर्षे ते शिर वाट पाहातंय अंत्यसंस्काराची...!

Diogo Alves : अनेकांची हत्या करणाऱ्या डिएगोचं शिर मात्र अंत्यसंस्काराची वाट पाहात आहे.

Diogo Alves : 'अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः। कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः॥' या श्लोकाचा अर्थ असा आहे की अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान, बिभीषण, कृप आणि पर्शुराम हे सात लोक चिरंजीव आहेत.याचा गर्भीत अर्थ असा आहे की सद्यस्थितीला या सात जणांचे गुण-अवगुण ज्यांच्या अंगी आहेत त्यांच्या रुपाने वरील हे सात जण जिवंत आहेत.यातला अश्वत्थामा हा क्रूर लोकांच्या रुपाने जिंवत आहे, त्याचबरोबर अश्वत्थाम्यासारख्या भळ-भळत्या जखमेचं दु:ख घेऊन जे लोक फिरताय त्यांच्या रुपानं अश्वत्थामा जिवंत आहे. असाच एक क्रूर अश्वत्थामा पोर्तुगिलच्या धर्तीवर सुमारे 181 वर्षांपूर्वी होऊन गेला. ज्यानं कित्येकांची हत्या केली आणि आता त्याचं शिर न झालेल्या अंत्यसंस्काराची जखम घेऊन एका काचेच्या भांड्यात बंद आहे.

डिएगो एल्वीस....!!
स्पेनमध्ये जन्मलेला हा पोरगा गरीबीचे चटके सोसतच मोठा झाला, वयाच्या 19 व्या वर्षी आई-बापानं नोकरी करता त्याला पोर्तुगालला पाठवून दिलं. पोर्तुगालच्या लिस्बन शहरात छोट्य- छोट्या नोकऱ्या करत डिएगो दिवस ढकलत होता नशीबाला शिव्या - शाप देत.  त्यातच तो एकीच्या प्रेमात पडतो, तिच्यासाठी खर्च करु लागतो. पैसे कमी पडत असतात, लिस्बनमध्ये राहणारे श्रीमंत लोक पाहत असतो, असे पैसे आपल्याकडे कधी आणि कसे येतील असा विचार करत फिरत असतो.

त्यातच काही लुट-मार करणाऱ्यांची लोकांना लुबाडून पैसे मिळविणाऱ्यांची त्याची ओळख होते आणि मग काय कललेल्या माणसाला वाऱ्याची झुळूकही पुरेशी असते कलंडायला. डिएगो विचार करतो 10 तास चाकरी करुन मालकाच्या शिव्या खाऊन पैसे मिळणार काय उपयोग त्याचा...?? हे लोक जसे पैसे कमावतात तसे आपणही मिळवावेत. मग छोट्या-छोट्या चोऱ्या करायला सुरुवात करतो. लिस्बन शहराच्या बाहेर अगवास लिबरस अँक्वेडक्ट नावाचा एक पुल असतो, जवळ जवळ 213 फूट उंच एक किलोमीटर लांब. डिएगोला एक कल्पना सुचते, शहरापासून दूर असलेल्या या पुलावरुन रोज शेतकरी ये-जा करत असतात. सकाळी शेताकडे जात असत आणि संध्याकाळी परत येत असत.

डिएगो मग या शेतकऱ्यांना आपला बकरा बनवायचं ठरवितो. एका संध्याकाळी उशीरा परतणाऱ्या शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवतो, पैसे काढून घेतो आणि त्या उंच असलेल्या पुलावरुन ढकलून देतो. मिळालेले पैसे मजा करायसाठी उडवायला सुरुवात करतो. पैसे संपले की परत एकदा पुलावर येतो आणि पुन्हा तेच करतो. हा सिलसिला आता सुरु होतो.  1836 ला जग आजच्या एवढं प्रगत नसतं, ना सी. सी. टी. व्ही. ना टेलिफोन यंत्रणा. घरचा माणूस गायब झाल्याची त्यावेळच्या पोलीस ठाण्यात तक्रार होते. त्यावेळी पोर्तुगालमध्ये शेतीची परिस्थिती भीषण झालेली होती त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली असावी असा संशय पुलाखाली डेड बाँडी सापडलेल्या पोलीसांना आणि घरातल्यांना येतो.

दिवस उलटत असतात. पुलाच्या पलिकडे असलेले एकेक शेतकरी डिएगोचे बळी ठरु लागतात. एके दिवशी एक शेतकरी डिएगोला विरोध करतो आणि मग डिएगो चाकूनं त्याच्यावर वार करतो आणि त्याला खाली फेकून देतो. या घटनेनंतर मात्र पोलीसांची घडलेल्या घटनांकडे पाहण्याची दृष्टीच बदलते.

शहरातही आता चर्चा सुरु होते ती सिरियल किलरची, कारण एव्हाना कित्येक शेतकरी  डिएगोमुळे गायब झालेले असतात. लोकांसाठी असलेल्या या अज्ञात सिरियल किलरला नाव दिलं गेलं “अक्वेटक मर्डरर”. यानंतर मात्र पोलीस या पुलावर गस्त बसवितात. मग मात्र डिएगो काही दिवसांसाठी गायब होतो, तब्बल तीन वर्षांसाठी. आता या लुटुपुटुच्या चोऱ्या-माऱ्या करण्यापेक्षा आपण अपग्रेड व्हायला पाहिजे ही कल्पना त्याच्या मनात येते आणि मग तो एक गँग तयार करतो.

आपल्यासारखे संयमी, सुस्वभावी, सज्जन त्याला हाताशी लागायला वेळ लागत नाही. टोळी तयार होते आणि दरोडा सत्र सुरु होतं. एकेक घरं फुटायला लागतात आणि खून पडायला लागतात. डिएगो एवढा क्रूर असतो की टोळीचा नियम बनवितो. ज्या घरात लूट केली त्यातली एकही व्यक्ती जिवंत सोडायची नाही, पुराव्यासाठी. घरातली सर्व माणसं मारली गेल्यामुळे किमान दोन-तीन दिवसांनी घटना समोर येत असे त्यामुळे आरोपी सापडत नसत.

अवघं शहर या दरोडा सत्रानं धास्तावलेलं असतं. सुर्यास्तानंतर पेटलेले डिएगोचे सहकारी डिएगोसह एकेका घराची राख-रांगोळी करु लागतात. एके दिवशी या टोळीची नजर एका घरावर पडचे त्या घर मालकाचं नाव असतं डॉ पँटरो अनड्रोडे. लिस्बीनमधला तो सुप्रसिध्द डॉक्टर असतो.

डॉक्टर घरी नसतात पण कुटुंब डिएगोच्या भक्षस्थानी पडतं, घरातली चारही माणसं मारली जातात आणि अवघ्या अर्ध्या तासात सुप्रसिध्द असलेल्या त्या डॉक्टरला भेटायला पेशन्ट येतो आणि अवघं शहर हादरुन जातं. डॉक्टरांच्या घरातल्याच चार लोकांची हत्या झाल्याचं समोर येतं.

मग पोलीस शहराची नाकेबंदी करतात आणि डिएगोसह त्याचे सहकारी पकडले जातात. पोलीसी खाक्यात चौकशी सुरु होते, सर्वांचं आधीचं रेकॉर्ड तपासलं जातं. डिएगोच्या सर्व सहकाऱ्यांवर काही ना काही छोटे छोटे गुन्हे असतात, डिएगो मात्र एकही गुन्हा नसलेला असतो. पण ते सर्व सांगतात की हा आमचा म्होरक्या आहे.

 मग पोलीस डिएगोला रिंगणात घेतात, मग डिएगो जे सांगतो  ते ऐकून पोलीस अवाक् होतात. त्या पुलावर केलेल्या एकेका खुनाचा हिशेब डिएगो देतो, सुमारे 70 जणांना मी यमसदनास धाडलं असं डिएगो सांगतो. ऐकणाऱ्याचं डोकं सुन्न होतं. पण त्या खुनांसाठीचा पुरावा नसतो. डिएगोसह इतरांवर डॉक्टरच्या कुटुंबीयांना मारल्याचा गुन्हा दाखल होतो.

काही महिन्यांनंतर डिएगोला फाशीची शिक्षा होते. त्या काळातला डिएगो हा सर्वात मोठा सिरियल किलर होता. शहरभर त्याचीच चर्चा होत असते, कसा काय हा असा असेल...?? कसला क्रूर असेल...?? कोणतं रसायन असेल डोक्यात...?? आणि मग खरंच त्यावेळच्या  मेडिकलसंबंधीत विचारसरणीनुसार काही डॉक्टर आणि शास्त्रज्ञ पुढे येतात आणि कोर्टाला डिएगोचा मेंदू अभ्यासासाठी मिळावा अशी विनंती करतात.

न्यायालयाकडून ही मागणी मान्य केली जाते, डिएगोला फाशी दिल्यानंतर त्याचं शीर कापलं जातं आणि अभ्यासासाठी शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांकडे सुपूर्त केलं जातं.

आज डिएगोचं शिर लिस्बन युनिव्हरसिटीच्या मेडिसिन कक्षात अँनाटाँमिकल थिएटरमध्ये एका बाटलीत विशिष्ठ रसायनामध्ये ठेवलेलं आहे. कित्येकांना यमसदनास पाठवणाऱ्या या क्रूरकर्माचं शिर पाहायला जगभरातून लोक आवर्जुन जातात. अनेकांची हत्या करणाऱ्या डिएगोचं शिर मात्र एक भळ-भळती जखम घेऊन अंत्यसंस्काराची वाट पाहात आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Kisan yojana : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! PM किसानचा 19 वा हप्ता 'या' दिवशी मिळणार, त्यापूर्वी करा 'हे' काम
PM Kisan yojana : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! PM किसानचा 19 वा हप्ता 'या' दिवशी मिळणार, त्यापूर्वी करा 'हे' काम
Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर सहकुटुंब राष्ट्रपती भवनमध्ये, दिलखुलास गप्पा अन् राष्ट्रपती मुर्मूंसाठी 'खास भेट'
सचिन तेंडुलकर सहकुटुंब राष्ट्रपती भवनमध्ये, दिलखुलास गप्पा अन् राष्ट्रपती मुर्मूंसाठी 'खास भेट'
सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed:सरपंच हत्येप्रकरणी Krushna Andhale फरार,मात्र कृष्णाच्या गँगची गुंडगिरी,होमगार्ड जवानाला मारहाणJob Majha:भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी 06 Feb 2025Ajit Pawar AK 47 Funny : महायुतीच्या बातम्या नीट द्या...नाहीतर उडवून टाकू! दादांची फटकेबाजीKaruna Sharma : मुंडे घराण्याचा एकमेवं वारस बेरोजगार आहे,करुणा शर्मांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan yojana : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! PM किसानचा 19 वा हप्ता 'या' दिवशी मिळणार, त्यापूर्वी करा 'हे' काम
PM Kisan yojana : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! PM किसानचा 19 वा हप्ता 'या' दिवशी मिळणार, त्यापूर्वी करा 'हे' काम
Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर सहकुटुंब राष्ट्रपती भवनमध्ये, दिलखुलास गप्पा अन् राष्ट्रपती मुर्मूंसाठी 'खास भेट'
सचिन तेंडुलकर सहकुटुंब राष्ट्रपती भवनमध्ये, दिलखुलास गप्पा अन् राष्ट्रपती मुर्मूंसाठी 'खास भेट'
सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
सोयाबीन खरेदीला 1 महिना मुदतवाढ द्या, अन्यथा राहिलेलं सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ, तुपकरांचा इशारा
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
शॉकींग! सांगलीत 4 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन पेटीत ठेवलं; नराधमास ठोकल्या बेड्या
Shreyas Iyer : 11 चौकार आणि षटकार! श्रेयस अय्यरची तोडफोड फलंदाजी; फक्त इतक्या चेंडूत ठोकले अर्धशतक, पाहा तुफानी फटकेबाजीचा Video
11 चौकार आणि षटकार! श्रेयस अय्यरची तोडफोड फलंदाजी; फक्त इतक्या चेंडूत ठोकले अर्धशतक, पाहा तुफानी फटकेबाजीचा Video
Video: आया रे तुफान...  सिंहाच्या जबड्यात हात; 'छावा' सिनेमातील नवं गाणं लाँच; शंभुराजेंचा लेझीम डान्स वगळला
Video: आया रे तुफान... सिंहाच्या जबड्यात हात; 'छावा' सिनेमातील नवं गाणं लाँच; शंभुराजेंचा लेझीम डान्स वगळला
Nashik Crime : पोलीस वेश बदलून बांधकाम साईटवर गेले अन्..., नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांना बेड्या, नेमकं काय घडलं?
पोलीस वेश बदलून बांधकाम साईटवर गेले अन्..., नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांना बेड्या, नेमकं काय घडलं?
MSEB मध्ये वायरी जोडणारे हात जेव्हा 'महावितरण श्री' जिंकतात; कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं पटकावला किताब
MSEB मध्ये वायरी जोडणारे हात जेव्हा 'महावितरण श्री' पटकावतात; कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं पटकावला किताब
Embed widget