एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

ब्रिक्झिटमुळे सेन्सेक्सला ब्रेक, निर्देशांक गडगडला !

मुंबईः ब्रिटनमध्ये होत असलेल्या जनमत चाचणीचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर झाला आहे. कारण मुंबई शेअर बाजार उघडताच, सेन्सेक्स तब्बल 900 अंकांनी  गडगडला आहे.   सेन्सेक्स काल 27002 अंकांवर बंद झाला होता, आज उघडताच तो 26367 अंकांवर जाऊन पोहोचला. दुसरीकडे पौंडचंही 31 वर्षातील निच्चांक गाठला, डॉलरच्या तुलनेत 9 टक्क्यांनी घसरला.   ब्रिटनने युरोपियन युनियनमध्ये राहावं की नाही, यासाठी तिथल्या नागरिंकांनी काल मतदान केलं आहे. या जनमत चाचणीचा निकाल  आज आहे. हा निकाल जगाच्या राजकारण आणि अर्थकारणावर दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो.   युरोपियन युनियनमध्ये रहावं, की नाही यावर ब्रिटनमध्ये खल सुरू आहे. ही लढाई इतकी पेटली आहे, की त्यात मजूर पक्षाच्या खासदार जोआना कॉक्स यांचा जीव गेला. त्या धक्क्यातून सावरून ब्रिटनच्या नागरिकांना आपलं भवितव्य ठरवायचं आहे.   काय आहे युरोपियन युनियन?
  • 28 देश आणि 50 कोटी लोकसंख्येच्या युरोपियन युनियनची अर्थव्यवस्था 16 खर्व डॉलर्सची असून तिचा जागतिक डरडोई उत्पन्नातला वाटा एक चतुर्थांश इतका आहे.
  • युरोपियन युनियनमधील नागरीक सदस्य देशात व्हिसाशिवाय मुक्तपणे प्रवास, व्यापार, नोकरी करू शकतात आणि तिथं युरो हे एकच चलन वापरलं जातं.
  • 1973 मध्ये ब्रिटननं या संघटनेचं सदस्यत्व स्वीकारलं.
  • पण बदललेल्या आर्थिक परिस्थितीत, खास करून निर्वासितांचे लोंढे वाढल्यावर युरोपियन युनियनमधून वेगळं होण्याच्या मागणीनं ब्रिटनमध्ये जोर धरला आहे. ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा म्हणजे ब्रेक्झिटचा निर्णय घेतला, तर त्याचे पडसाद जगभर उमटतील.
    ब्रिक्झिटचे भारतावर होणारे परिणाम
  • युरोपियन युनियन ही भारतासाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारतीय कंपन्यांसाठी ब्रिटन हे युरोपचं प्रवेशद्वार बनलं आहे.
  • जवळपास 800 हून अधिक भारतीय कंपन्यांची ब्रिटनमध्ये गुंतवणूक असून, त्यात आयटी, स्टील आणि ऑटोमोबाईल कंपन्यांचा वाटा मोठा आहे. आयटी क्षेत्रातील भारतीय कंपन्यांची 6 ते 18 टक्के कमाई ब्रिटनमधून होते.
  • ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यास या सर्व कंपन्यांना युरोपातील इतर देशांशी नव्यानं करार करावे लागतील. त्यामुळं खर्चात वाढ तर होईलच, शिवाय वेगवेगळ्या देशांत वेगळवेगळ्या कायद्यांनुसार काम करावं लागेल.
  • ब्रेक्झिटमुळे युरो आणि पाऊंड या चलनांमध्ये स्पर्धा सुरू होऊन त्यात डॉलरचा भाव वधारू शकतो. अशा परिस्थितीत रुपयाचं मूल्य घसरल्यानं कच्चं तेल, सोनं, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीला मोठा फटका बसेल. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्यानं पर्यायानं भारतात महागाई आणखी वाढेल. तर जगभरातील शेअर बाजारांवरही परिणाम होईल.
  • युरोपियन युनियनमधून वेगळं झाल्यास ब्रिटनचा पैसा वाचेल, पण जवळपास दहा लाख ब्रिटिश नागरिकांना नोकरी गमवावी लागू शकते.
  • हे सारं काही एका झटक्यात होणार नाही, तर त्यासाठी दोन वर्षांचा कालवधी लागेल. पण निकाल काहीही लागला, तरी ही जनमत चाचणी युरोपचं आणि जगाचंही भवितव्य निश्चित करू शकते.

संबंधित बातमी

ब्रिटनमधील जनमत चाचणीकडे जगाचं लक्ष 

ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडणार का, जगाचं लक्ष ब्रिक्झेटकडे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Police: पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार
पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार "सर्च लाईट"; बोपदेव घाटातील घटनेनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
Sharad Pawar: माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
Rahul Gandhi In Kolhapur : शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Harshwardhan Patil Join Sharad Pawar : हर्षवर्धन पाटील उद्या राष्ट्रवादीत, शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणारHiraman Khoskar Meet Sharad Pawar : काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी, खोसकरांची शरद पवारांसोबत चर्चाABP Majha Marathi News Headlines TOP Headlines 11 AM 06 October 2024Nitin Gadkari Sangli : मुंबई-पुणे-बंगळूर महामार्ग बांधणार, पाच ठिकाणी उतरणार विमान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police: पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार
पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवणार "सर्च लाईट"; बोपदेव घाटातील घटनेनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
हेच का अच्छे दिन? छत्रपती संभाजीराजे मुंबईत धडकले, सरकारविरोधात आंदोलनाचं शस्त्र, नेमकं कारण काय?
Sharad Pawar: माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
माढ्यात शिंदे कुटुंबाकडे तुतारी सोपवून शरद पवार 'या' तीन मतदारसंघातील राजकारण कसं साधणार?
Rahul Gandhi In Kolhapur : शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात लढाई ते आरक्षण मर्यादेची भिंत तोडणारच! राहुल गांधींनी रणशिंग फुंकले!
Tomato Price : टोमॅटोची 'लाली' वाढली, बळीराजाला दिलासा, 1 किलो टोमॅटो घेण्यासाठी द्यावे लागतात 'एवढे' पैसे 
टोमॅटोची 'लाली' वाढली, बळीराजाला दिलासा, 1 किलो टोमॅटो घेण्यासाठी द्यावे लागतात 'एवढे' पैसे 
Mangal Gochar 2024 : दिवाळीपूर्वीच मंगळाची चाल बदलणार; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
दिवाळीपूर्वीच मंगळाची चाल बदलणार; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
मोठी बातमी! क्रॉस व्होटिंगचा ठपका असलेले काँग्रेस आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला, नेमकं काय आहे कारण?
Ahmednagar News : मंदिराच्या परिसरात दारु आणि मांसविक्रीच्या दुकानांवर बंदी घाला, वारकऱ्यांच्या मागणीवर विखे पाटील म्हणाले...
मंदिराच्या परिसरात दारु आणि मांसविक्रीच्या दुकानांवर बंदी घाला, वारकऱ्यांच्या मागणीवर विखे पाटील म्हणाले...
Embed widget