Russia Ukraine War : मोठी बातमी! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; डागली 84 क्षेपणास्त्रं, 11 जणांचा मृत्यू
Russian Attack in Ukraine : रशियाने युक्रेनवर 84 क्षेपणास्त्रं डागत मोठा हल्ला केला आहे. क्रीमियामधील स्फोटानंतर रशियाचे युक्रेनवरील हल्ले तीव्र केले आहेत.
Russian Missile Attack in Ukraine : क्रीमियामध्ये (Crimean Peninsula)झालेल्या स्फोटानंतर रशियाने (Russia) अधिक आक्रमक भूमिका घेतली असून युक्रेनवर (Ukraine) मोठा हल्ला केला आहे. रशियाच्या ताब्यात असलेल्या क्रीमियामधील एका पुलावर (Crimea Bridge Blast) स्फोट झाला. रशियाने या स्फोटासाठी युक्रेनला जबाबदार ठरवत त्यांच्यावरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत. रशियाने आता युक्रेनवर 84 क्षेपणास्त्रं डागत (Missile Attack) हल्ला केला आहे. यामध्ये सुमारे 11 जणांचा मृत्यू झाला असून 70 लोक जखमी झाले आहेत. युद्ध सुरु झाल्यापासूनचा युक्रेनवर रशियाने केलेला आतापर्यंतला हा मोठा हल्ला असल्याचं म्हटलं जातं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सोमवारी 10 ऑक्टोबर रोजी रशियाने युक्रेनवर हा मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला आहे.
युक्रेनमधील मुख्य ऊर्जा स्त्रोत आणि सुविधांना लक्ष्य केलं
क्रीमियामधील स्फोट आणि लायमन शहरावर युक्रेनने पुन्हा मिळवलेला ताबा यामुळे रशिया अधिक खवळला आहे. मात्र युक्रेनने क्रीमियातील पुलावर झालेल्या स्फोटासंबंधित रशियाने केलेले आरोप फेटाळले आहेत. यानंतर रशियाने युक्रेनवरील हल्ले तीव्र केले आहेत. या क्षेपणास्त्रं हल्ल्यात युक्रेनची राजधानी कीव्हसह अनेक शहरात मोठं नुकसान झालं आहे.
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयालाही लक्ष्य करण्यात आलंय. या क्षेपणास्त्रं हल्ल्याचं मुख्य उद्दीष्ट युक्रेनमधील मुख्य ऊर्जा स्त्रोत आणि ऊर्जा सुविधांचं नुकसान करणं आहे. यामुळे युक्रेनची राजधानी कीव्हसह ऊर्जा स्त्रोत असणाऱ्या दक्षिणेकडील अनेक शहरांना लक्ष्य करत क्षेपणास्त्रं डागण्यात आली आहेत.
Russia launches its most widespread air attacks on Ukraine since the start of the war. Here’s what you need to know right now https://t.co/G4Tw7eygWh pic.twitter.com/C8hjfNr3Uz
— Reuters (@Reuters) October 10, 2022
रशियाच्या हल्ल्यांवर युक्रेने राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची प्रतिक्रिया
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी रशियाच्या हल्ल्यांवर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, देशभरात रशियाकडून अनेक हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेक लोक मारले गेले आहेत आणि अनेक जण जखमी झाले आहेत. रशियाने हल्ले करत युक्रेनमधील ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य केलं आहे. झेलेन्स्की यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये शहरातील अनेक भागात धुराचे लोट उठताना दिसत आहे. क्रीमियातील ब्रिज स्फोटानंतर आक्रमक झालेल्या पुतिन यांनी सोमवारी क्रीमियामध्ये राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठकही बोलावली होती. त्यानंतर युक्रेववर 84 क्षेपणास्त्रं डागण्यात आली.