Russia Ukraine War: Russia Ukraine War: अमेरिका आणि पोलंडमध्ये मोठा करार! रशियाविरुद्ध लढा देण्यासाठी युक्रेनला मिळणार लढाऊ विमाने
रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. याच दरम्यान रशियाविरुद्धच्या युद्धात लवकरच युक्रेनला लढाऊ विमान पुरवले जाणार असल्याचा दावा अमेरिकी माध्यमांनी केला आहे.
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. याच दरम्यान रशियाविरुद्धच्या युद्धात लवकरच युक्रेनला लढाऊ विमान पुरवले जाणार असल्याचा दावा अमेरिकी माध्यमांनी केला आहे. अमेरिका आणि पोलंडमध्ये या संदर्भात करार झाला असल्याचं अमेरिकी माध्यमांनी वृत्त दिलं आहे. ही सर्व विमाने सोव्हिएत काळातील असतील आणि पोलंडमार्गे युक्रेनला दिली जातील. जेणेकरून युक्रेनला आपले संरक्षण करता येईल. असं असलं तरी अद्याप अधिकृतपणे अमेरिका किंवा पोलंडने याची पुष्टी केलेली नाही.
अमेरिकी माध्यमांनी दावा केला आहे की, पोलंड युक्रेनला सोव्हिएत काळातील लढाऊ विमाने देणार. या बदल्यात अमेरिका पोलंडला F-16 लढाऊ विमान देईल. रशियाने 11 दिवसांपूर्वी युक्रेनवर आक्रमण करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात दोन्ही देशांचे शेकडो सैनिक मारले गेले असून युक्रेनच्या अनेक नागरिकांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. पाश्चिमात्य देशांकडून युक्रेनला शस्त्रास्त्रांसह सर्व प्रकारची मदत सातत्याने केली जात आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी अनेकवेळा पाश्चात्य देशांना मदतीचे आवाहन केले आहे.
अलीकडेच झेलेन्स्की यांनी 'नाटो'कडे युक्रेनला नो-फ्लाय झोन घोषित करण्याची मागणी केली होती. मात्र झेलेन्स्कीची मागणी फेटाळण्यात आली. यानंतर त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह सर्व पाश्चिमात्य देशांच्या नेत्यांशी चर्चा केली आणि लष्करी मदत मागितली. युक्रेनच्या नेत्याने शनिवारी व्हिडीओ कॉलद्वारे अमेरिकी खासदारांना संबोधित केले. त्यांनी रशियन तेल आयात आणि निधीवर निर्बंध घालण्याची मागणी केली. व्हाईट हाऊसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनला लष्करी मदत देण्याच्या मुद्द्यावर नाटो सहयोगी देशांशीही चर्चा सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
- युक्रेनमध्ये मोदी सरकार, पिसोचेनमध्ये अडकेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी पोहचल्या तीन बस
- Russia Ukraine War : रशिया-युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येऊ शकते? जाणून घ्या शक्यता
- Russia Ukraine War : नागरीक घरातच झाले कैद, खाण्यापिण्याचे होताहेत हाल
- Russia Ukraine Conflict : हवाई प्रवास महागणार; युक्रेन-रशिया युद्धामुळे हवाई इंधनाच्या किमती विक्रमी पातळीवर