Russia Ukraine War : रशिया-युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येऊ शकते? जाणून घ्या शक्यता
Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाचा आज 10 वा दिवस आहे. या युद्धाचा परिणाम जगभरात दिसून येत असून दिवसेंदिवस याची भीतीही गडद होत चालली आहे.
Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia-Ukraine War) आज 10 वा दिवस, रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर सुरू झालेले युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही आहे. येणारा प्रत्येक दिवस भीषण होत चालला आहे. या युद्धाचा परिणाम जगभरात दिसून येत असून याबाबत भीतीही गडद होत चालली आहे. यावेळी सर्वात मोठा प्रश्न उरतो की हे युद्ध कधी थांबणार? दरम्यान हे युद्ध कोणत्या परिस्थितीत संपुष्टात येऊ शकते. याबाबत कोणत्या शक्यता असू शकतात. वाचा सविस्तर
हे युद्ध थांबणार कधी? जाणून घ्या शक्यता
-येत्या काही दिवसांत रशियाने युक्रेनची राजधानी ताब्यात घेतल्यास हे युद्ध संपवण्याची घोषणा करू शकते.
-याशिवाय युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचा युद्धा दरम्यान मृत्यू झाल्यास किंवा त्यांनी देश सोडल्यास रशिया युद्ध संपवू शकतो. मग रशिया तिथे आपले सरकार निर्माण करू शकतो.
-जर रशियन सैन्य अधिक काळ कीव्ह काबीज करू शकले नाही. तर हे युद्ध दीर्घकाळ चालू शकते याची सर्वाधिक भीती आहे. कारण पाश्चात्य देश युक्रेनला सतत शस्त्रे पुरवत आहेत, त्यामुळे युक्रेनचे सैन्य रशियाशी लढत आहे.
-रशिया आणि युक्रेनमध्ये सततच्या युद्धाबाबतही वाटाघाटी होत आहेत. आतापर्यंत चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या असून दोन्ही देश लवकरच चर्चेच्या तिसऱ्या फेरीसाठी तयार आहेत.
-जर सर्व काही सुरळीत झाले तर युद्ध संपवण्यासाठी दोघांमध्ये करार होऊ शकतो. पण याची शक्यता फारच कमी दिसते.
-रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर आक्रमण करण्याचा आदेश दिल्यानंतर रशियामध्ये निदर्शने सुरू आहेत.
-जगातील सर्वच देशांमध्ये निर्बंध लादण्यात आले असून, त्याचा फटका जनतेला सहन करावा लागणार आहे.
-तज्ञांच्या मते, या युद्धामुळे पुतिन यांच्या लोकप्रियतेवर वाईट परिणाम झाला आहे आणि त्यांच्या हातातून सत्ताही जाऊ शकते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War : नागरीक घरातच झाले कैद, खाण्यापिण्याचे होताहेत हाल
- Russia Ukraine Conflict : हवाई प्रवास महागणार; युक्रेन-रशिया युद्धामुळे हवाई इंधनाच्या किमती विक्रमी पातळीवर
- Russia Ukraine War : युक्रेनमधील 182 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे विमान मुंबईत दाखल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha