Russia Ukraine War : युद्ध थांबवण्यासाठी रशियाकडून युक्रेनमधील डोनेट्स्क प्रांताची मागणी, चर्चेसाठी पुतिन यांची तयारी
Russia Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनमधील डोनेट्स्क हा प्रांत रशियाला देण्याची मागणी केली आहे.
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनसमोर काही अटी ठेवल्या आहेत. युक्रेनमधील डोनेट्स्क हा प्रांत रशियाला दिला तर, हे युद्ध थांबू शकते असे संकेत पुतिन यांनी दिले आहेत.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज दहावा दिवस आहे. या युद्धात दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, अजूनही कोणताच देश मागे हटण्यास तयार नाही. याच दरम्यान पुतिन यांनी काही अटींवर हे युद्ध थांबू शकतं असं म्हटलं आहे. युक्रेनमधील डोनेट्स्क हा प्रांत रशियाच्या ताब्यात देण्यात यावा, या शिवाय युक्रेनमधून नाझीवीदींना हद्दपार व्हावं लागेल. या अटी मान्य केल्या तर हे युद्द थांबू शकतं असे संकेत व्लादिमीर पुतिन यांनी दिले आहेत.
व्लादिमीर पुतीन यांनी या अटी ठेवताना युक्रेनसोबत चर्चा करण्याची तयारी असल्याचेही म्हटले आहे. परंतु, रशियाने ठेवलेल्या अटी युक्रेनने कोणत्याही अटींशिवाय मान्य केल्या तरच दोन्ही देशांमध्ये चर्चा होऊ शकते असे पुतिन यांनी म्हटले आहे.
"युक्रेनमधील डोनेट्स्क हा प्रांत रशियाच्या ताब्यात देण्यात यावा, युक्रेनमधून नाझीवीदींना हद्दपार व्हावं लागेल, या मागणीसह युक्रेन हा तटस्थ आणि गैर-अणुऊर्जा देश असेल, क्रिमिया हा रशियाचा भाग असल्याचे युक्रेनने मान्य करावे आणि युक्रेनने पूर्व युक्रेनच्या बंडखोर भागांचे स्वातंत्र्य मान्य करावे, अशा मागण्या पुतीन यांनी केल्या आहेत. आज युद्धाच्या दहाव्या दिवशी पुतिन यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.
दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे दोन्ही देशांची मोठी हाणी झाली आहे. युद्ध सुरु असतानाच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमर झेलेन्स्की यांनी नाटोवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. याबरोबच रशियाच्या जवळपास दहा हजार सैन्यांना मारल्याचा दावाही झेलेन्स्की यांनी केला आहे.
Donetsk प्रांत द्या, युद्ध थांबवू, युद्धाच्या दहाव्या दिवशी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची नवी मागणी, पाहा व्हिडीओ
महत्वाच्या बातम्या
- युक्रेनमध्ये मोदी सरकार, पिसोचेनमध्ये अडकेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी पोहचल्या तीन बस
- Russia Ukraine War : रशिया-युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येऊ शकते? जाणून घ्या शक्यता
- Russia Ukraine War : नागरीक घरातच झाले कैद, खाण्यापिण्याचे होताहेत हाल
- Russia Ukraine Conflict : हवाई प्रवास महागणार; युक्रेन-रशिया युद्धामुळे हवाई इंधनाच्या किमती विक्रमी पातळीवर