ट्रक ड्रायव्हरला अपघातासाठी तब्बल 110 वर्षांची शिक्षा; शिक्षा कमी करण्यासाठी सेलिब्रिटींचा पुढाकार
26 वर्षाचा ड्रक ड्रायव्हर रॉगेल एगुइलेरा-मेडेरोस हा एप्रिल 2019 मध्ये कोलोरॅडोच्या पश्चिमेकडील पर्वतीय भागात ट्रकमध्ये लाकूड घेऊत जात होता.
Kim Kardashian : अभिनेत्री किम कार्दशियन (kim kardashian) तिच्या चित्रपटांमुळे तसेच तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. किम सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. तिनं ड्रक ड्रायव्हर रॉगेल एगुइलेरा-मेडेरोस (Rogel Aguilera-Mederos) याची शिक्षा कमी करण्याची मागणी सोशल मीडिया पोस्टमधून केली आहे. त्या ड्रक ड्रायव्हरला तब्बल 110 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जाणून घेऊयात काय आहे प्रकरण-
26 वर्षाचा ड्रक ड्रायव्हर रॉगेल एगुइलेरा-मेडेरोस हा एप्रिल 2019 मध्ये कोलोरॅडोच्या पश्चिमेकडील पर्वतीय भागात ट्रकमध्ये लाकूड घेऊत जात होता. त्यावेळी उतारावर त्याच्या ट्रकचे ब्रेक फेल झाले आणि तो आपत्कालीन एक्झिट रॅम्पचा वापर करण्यात अयशस्वी झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी अवस्थेत सापडले. रॉगेल एगुइलेरा-मेडेरोसला 27 गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले. गेल्या आठवड्यात न्यायाधीशाने त्याला 110 वर्षांची शिक्षा सुनावली.
किम कार्दशियनसह 4.5 दशलक्षाहून अधिक लोकांनी 2019 च्या अपघातामुळे यूएसमधील ट्रक ड्रायव्हरला सुनावण्यात आलेल्या शिक्षेला विरोध केला आहे. त्याची शिक्षा कमी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. रॉगेल एगुइलेरा-मेडेरोस या ड्रक ड्रायव्हरला110 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
परंतु तुरुंगवासाच्या कालावधीमुळे अनेक लोक या निर्णयाला विरोध करत आहेत. 4.6 दशलक्ष लोकांनी Change.org ऑनलाइन याचिकेवर स्वाक्षरी केली आहे. ज्यात रॉगेल एगुइलेरा-मेडेरोसच्या शिक्षेच्या शिक्षेचा कालावधी कमी करण्याची मागणी केली आहे.
वकीली होण्यासाठी शिक्षण घेत असलेली अमेरिकेमधील प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री किम कार्दशियनने सोशल मीडियावर रॉगेल एगुइलेरा-मेडेरोसबद्दल पोस्ट केली. किम कार्दशियनने ट्वीट केलं. त्या ट्वीटमध्ये तिने लिहिले, 'मला माहित आहे की प्रत्येकजण या आठवड्यात रोजेल एगुइलेरा-मेडेरोस बद्दल पोस्ट करत आहे. हे प्रकरण नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी या संदर्भात माहिती मिळवत आहे. या प्रकरणाचा एक धक्कादायक आणि अन्यायकारक भाग असा आहे. की,न्यायाधीशांना त्याला इतकी मोठी शिक्षा दिली. कोलोरॅडो कायदा खरोखर बदलला पाहिजे आणि हे खूप अन्यायकारक आहे.'
I know everyone has been posting about Rogel Aguilera-Mederos this week. I took a deep dive in it to figure out what the situation is. pic.twitter.com/617xtcGOMK
— Kim Kardashian West (@KimKardashian) December 21, 2021
कोलोरॅडोमधील काही ट्रक ड्रायव्हर्सने त्यांचे काम बंद ठेवून रॉगेल एगुइलेरा-मेडेरोसची शिक्षा कमी करण्याची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :