एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ मोहम्मद पैगंबरांची वंशज?
ब्रिटनची क्वीन एलिझाबेथ ही मोहम्मद पैगंबरांचीही वंशज असल्याचा दावा अब्दल हामिद अल-अव यांनी मोरोक्कोतील वर्तमानपत्रातील एका लेखात केला आहे.
राबत (मोरक्को) : ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ ही इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची थेट वंशज आहे, असा दावा 'मोरक्को'च्या वर्तमानपत्रात करण्यात आला आहे.
क्वीन एलिझाबेथ ही कोणे एके काळी स्पेनवर हुकूमत गाजवणाऱ्या अरबी बादशाहांची वंशज आहे. यानुसार ती मोहम्मद पैगंबरांचीही वंशज होते, असा दावा अब्दल हामिद अल-अव यांनी लेखात केला आहे. मोरक्कोमधील 'अल औसबा' या अरबी वर्तमानपत्रात मार्च महिन्यामध्ये हा लेख छापण्यात आला होता.
एलिझाबेथ द्वितीय ही जगातील सर्वात दीर्घ वारसा लाभलेली राणी मानली जाऊ शकते. मोरक्कोचे बादशाह मोहम्मद चौथे आणि जॉर्डनचे बादशाह अब्दुल्ला द्वितीय यांची ती नातेवाईक आहे, असं लेखात म्हटलं आहे. क्वीन एलिझाबेथच्या 43 पिढ्यांचा अभ्यास करुन हे संशोधन मांडण्यात आलं आहे.
अकराव्या शतकातील सेविलेचे शासक अबु-अल-कासिम मोहम्मद बिन-अब्बाद पैगंबर मोहम्मद यांची कन्या फातिमा यांच्याशी एलिझाबेथचा थेट संबंध येतो. कासिमला 'जायदा' नावाची आणखी एक कन्या होती. अब्बासी राजवटीवर अल्मोराविद शासकाने हल्ला केला, त्यावेळी जायदा स्पेनला पळून गेली.
स्पेनला गेल्यावर जायदाने आपलं नाव बदलून 'इजाबेल' असं ठेवलं आणि रोमन कॅथलिक धर्म स्वीकारला. जायदाने स्पेनचा राजा अल्फान्सो सहावा याच्याशी लग्न केलं. त्यांना 'सांचा' हा मुलगा होता. सांचाचे वारस केम्ब्रिजचे तिसरे अर्ल रिचर्ड. ते इंग्लंडचा राजा एडवर्ड तिसरा याचे नातू. मोरक्को, एंडुलुसिया आणि युरोपीय राजांच्या शरीरात पैगंबरांचं रक्त वाहत आहे, असा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
91 वर्षीय एलिझाबेथ या राष्ट्रकुल देशांच्या प्रमुख आहेत. राष्ट्रकुल म्हणजे कोणे एके काळी ब्रिटनच्या अधिपत्याखाली असलेले देश. इतिहासकारांनी एलिझाबेथच्या वंशजांच्या बाबतीत अनेक दावे केले असले, तरी बर्मिंगहॅम पॅलेसमधून कोणतंही वक्तव्य करण्यात आलेलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement