एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कंदील बलोचचं फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंट बंद
मुंबई : मागील आठवड्यात पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची तिच्या भावानेच हत्या केली होती. त्यानंतर नुकतीच तिची फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंट डिलीट करण्यात आली आहेत. फेसबुकच्या नियमावलीनुसार जर फेसबुक वापरकर्त्याचा मृत्यू झाल्यास त्याचं फेसबुक अकाऊंट आपोआप मेमरी अकाउंटमध्ये जमा होते. या अकाऊंटच्या टाईमलाईनवर मृत व्यक्तीच्या मित्र आणि परिवाराला त्याच्याशी निगडीत आठवणी शेअर करता येउ शकतील.
फेसबुक हेल्प सेंटरवर दिलेल्या माहितीनुसार जर एखाद्या व्यक्तीने अकाऊंट बंद करण्यासाठी विनंती केल्यास त्याचे अकाउंट बंद करण्यात येते. कंदील बलोचचं अकाऊंट का बंद झालं याचं कारण अद्याप समजू शकले नाही.
याच एक कारण असंही असू शकेल का कंदीलच्या मृत्यूनंतर बऱ्याच लोकांनी तिच्या मृत्यूची माहिती फेसबुकला दिली असेल ज्यामुळे तिचं अकाऊंट बंद करण्यात आलं आहे. तसेच सरकारच्या शिफारशीवरूनही अकाऊंट बंद होण्याची शक्यता आहे. यापूर्वी बऱ्याचदा सरकारच्या शिफारशीवरून कंदीलच्या अकाऊंटवरील मजकुर तसेच बऱ्याचदा ब्लॉकही करण्यात आलं आहे.
26 वर्षीय कंदीलची हत्या मुलतानमधील राहत्या घरी तिच्याच भावाने केली होती. यानंतर तिच्या भावाला अटकही करण्यात आली होती. भावानेही आपला गुन्हा कबुल केला आहे, कंदीलचं सोशल मीडियावरील केवळ ट्विटर अकाउंट अद्याप सुरू आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement