एक्स्प्लोर
भूकंपामुळे इटलीतील अमात्रिस उद्ध्वस्त, 159 जण मृत्युमुखी
![भूकंपामुळे इटलीतील अमात्रिस उद्ध्वस्त, 159 जण मृत्युमुखी Powerful Earthquake In Italy 159 Deaths भूकंपामुळे इटलीतील अमात्रिस उद्ध्वस्त, 159 जण मृत्युमुखी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/25082952/Italy-Quake_AHUJ-4-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
एकुमोली/इटली: मध्य इटलीमध्ये बुधवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपात जवळपास 159 जण मृत्युमुखी पडले आहेत. या भूकंपाची तीव्रता 6.2 रिश्टर इतकी होती. स्थानिक वेळेनुसार 3 वाजून 36 मिनिटांनी झालेल्या या भूकंपात अनेक अमात्रिस शहर मोठ्या प्रमाणावर उद्धस्त झालं आहे, तसंच हजारो नागरिक बेघर झाले आहेत.
इटलीत झालेल्या या भूकंपात 368 नागरिक जखमी झाले आहेत, तसंच ढिगाऱ्याखाली शेकडो लोक दबले गेल्याची भीती इटलीचे पंतप्रधान मतेओ रेंजी यांनी वर्तवली आहे. तसंच ही संख्या वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. पोप फ्रान्सिस यांनी सेंट पीटर्सबर्गमधील आपला साप्ताहिक कार्यक्रम रद्द करत या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं.
पुन्हा भूकंप येण्याची शक्यता असल्याने शेकडो नागरिकांनी आपत्कालीन छावण्यांचा आश्रय घेतला. या भूकंपात उमब्रिया, मार्चे लाजिओसह इटलीतील मोठा भाग उद्धस्त झाला आहे. या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची वर्दळ होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणवर जीवितहानी होण्याची शक्यता आहे. बचावकार्यही युद्धपातळीवर राबवण्यात येत आहे.
2009 साली झालेल्या भूकंपात सुमारे 300 नागरिक मृत्युमुखी पडले होते. या भूकंपात 13व्या शतकातील एका टॉवरवरील जुनं घड्याळही बंद पडलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
बातम्या
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)