एक्स्प्लोर

भारत आज जगामध्ये चमत्कार करतोय, त्यामुळे अनेकजण आश्चर्यचकित : नरेंद्र मोदी

अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट झाला तर प्रत्येक भारतीयाचे उत्पन्न वाढेल. खरेदी करण्याची क्षमता वाढेल, असेही ते म्हणाले. इन्फ्रास्टक्चरचे जाळे उभारण्याचे भारतामध्ये मोठे काम सुरु आहे. पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचण्याची भारतामध्ये क्षमता आहे आणि प्लानही आहे, असेही त्यांनी सांगितले.

बहारिन : जगासमोर भारताने आपले सामर्थ्य दाखवले आहे. भारत आज जगामध्ये चमत्कार करत आहे. त्यामुळे अनेकजण आश्चर्यचकित आहेत. भारताची प्रतिभा ही जागतिक ओळख आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी केले आहे. मोदींनी आज बहारिनमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केले. ते म्हणाले की, पुढच्या पाच वर्षात अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट करायचे भारताने ठरवले आहे. भारताला पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे आमचे लक्ष्य आहे.  अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट झाला तर प्रत्येक भारतीयाचे उत्पन्न वाढेल. खरेदी करण्याची क्षमता वाढेल. अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट झाला तर प्रत्येक भारतीयाचे उत्पन्न वाढेल. खरेदी करण्याची क्षमता वाढेल, असेही ते म्हणाले. इन्फ्रास्टक्चरचे जाळे उभारण्याचे भारतामध्ये मोठे काम सुरु आहे. पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचण्याची भारतामध्ये क्षमता आहे आणि प्लानही आहे, असेही त्यांनी सांगितले. मोदी पुढे म्हणाले की, भारतातील बहुतांश कुटुंब बँकिंग सेवेशी जोडलेली आहेत. भारतात सर्वात स्वस्त इंटरनेट आहे. 50 कोटी भारतीयांना देशात मोफत उपचार मिळतात. आता भारतीयांचा आत्मविश्वास उंचावला आहे, असे ते म्हणाले. बहारिनमध्ये भारतीयांनी त्यांच्या मेहनतीने स्वत:ची जागा बनवली आहे. बहारिनचे सत्ताधारी तुमचे कौतुक करत असताना अभिमानाने माझा ऊर भरुन येत होता. बहारिनला येणारा मी पहिला पंतप्रधान ठरलो हे माझे भाग्य आहे. इथे येऊन मला भारतात असल्यासारखे वाटत असल्याचे देखील ते म्हणाले.  बहारिनचे न्यू इंडियामध्ये स्वागत आहे.  दोन्ही देशांना परस्पराकडून भरपूर काही मिळाले आहे, असेही ते म्हणाले. मोदी यांनी भाषणाच्या शेवटी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली. अरुण जेटली यांच्याबद्दल बोलताना मोदी भावूक झाले होते. ते म्हणाले, एका बाजूला बहारिन उत्साहाने भरलेले आहे.  पण माझ्या मनात तीव्र दु:खाची भावना आहे. विद्यार्थी दशेपासून ज्या मित्रासोबत सार्वजनिक जीवनात पावले टाकली. राजकीय जीवनात एकत्र प्रवास केला. प्रत्येक क्षणी एकमेकांसोबत होतो. स्वप्ने पाहिली, स्वप्ने पूर्ण केली. असा एक मोठा प्रवास ज्या मित्रासोबत केला. ते माझे मित्र अरुण जेटली यांचे आज निधन झाले, असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
400 वर्ष जगणारा मासा, 150 वर्षानंतर देतो पिलांना जन्म, तब्बल 10 वर्ष पिलांना वाढवतो पोटात, नेमका कुठे आढळतो हा मासा? 
400 वर्ष जगणारा मासा, 150 वर्षानंतर देतो पिलांना जन्म, तब्बल 10 वर्ष पिलांना वाढवतो पोटात, नेमका कुठे आढळतो हा मासा? 

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Death: नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया
Gold Silver Rate : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर
Pune MPSC Protest: एमपीएससी आंदोलनात उपोषण सोडताच पुणे पोलिसांकडून ऋषिकेश गांगुर्डे, सोमनाथ चव्हाण, गजानन शेळकेसह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल; रोहित पवार अन् विवेकानंद पाटीलचं काय झालं?
एमपीएससी आंदोलनात उपोषण सोडताच पुणे पोलिसांकडून ऋषिकेश गांगुर्डे, सोमनाथ चव्हाण, गजानन शेळकेसह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल; रोहित पवार अन् विवेकानंद पाटीलचं काय झालं?
Abhijeet Dipke: 'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
आदित्य ठाकरे म्हणाले, देशात आणीबाणी; म्हणाले, लोकांना ताब्यात घेतलं, नोटीस बजावल्या, रेल्वे रद्द, मेट्रो बंद
आदित्य ठाकरे म्हणाले, देशात आणीबाणी; म्हणाले, लोकांना ताब्यात घेतलं, नोटीस बजावल्या, रेल्वे रद्द, मेट्रो बंद
Embed widget