PM Narendra Modi : अबूधाबीतील मंदिराच्या प्रस्तावासाठी क्षणार्धात होकार, भारत -युएई दोस्ती जिंदाबाद; पीएम मोदींची अबूधाबीतून घोषणाबाजी
PM Narendra Modi : "तुम्ही युएईच्या (United Arab Emirates) काणाकोपऱ्यातून आला आहात. भारतीय पण आले आहेत. मात्र, सर्वांची मने एकजूट झाली आहेत. प्रत्येकजण म्हणतोय भारत -युएई दोस्ती जिंदाबाद. हा क्षण प्रत्येकाने आनंदाने जगावा. या आठवणी तुमच्या आयुष्यभर लक्षात राहणार आहेत", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.
PM Narendra Modi : "तुम्ही युएईच्या (United Arab Emirates) काणाकोपऱ्यातून आला आहात. भारतीय पण आले आहेत. मात्र, सर्वांची मने एकजूट झाली आहेत. प्रत्येकजण म्हणतोय भारत -युएई दोस्ती जिंदाबाद. हा क्षण प्रत्येकाने आनंदाने जगावा. या आठवणी तुमच्या आयुष्यभर लक्षात राहणार आहेत", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले. ते अबूधाबीत बोलत होते. यावेळी हजारो भारतीय लोकही उपस्थित होते.
पुढे बोलताना मोदी म्हणाले, मी आज माझ्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी आलो आहे. तुम्ही ज्या देशात जन्म घेतला. तिथल्या मातीचा सुगंध तुमच्यासाठी घेऊन आलोय. मी तुमच्यासाठी 140 कोटी भारतीयांचा संदेश घेऊन आलोय. भारतीयांना तुमचा अभिमान वाटतो. तुमचा आवाज आज अबूधाबीच्या आकाशातून आरपार जात आहे.
तुम्ही वेळ काढून इथे आलात तुमचा मी आभारी आहे. आज आपल्यासोबत शेख नायानबी उपस्थित आहेत. ते भारतीय समुदायाचे चांगले मित्र आणि शुभचिंतक आहेत. या कार्यक्रमाच्या शानदार आयोजनासाठी मी त्यांचे आभार मानतो. जोशाने होत असलेला हा कार्यक्रम त्यांच्या योगदानाशिवाय पार पडला नसता, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
पीएम मोदींकडून 2015 च्या आठवणींना उजाळा
मला 2015 ची पहिली यात्रा आठवते. मी केंद्र सरकारमध्ये सत्तेत येऊन फार कालावधी झाला नव्हता. 2-3 दशकानंतर भारतीय पंतप्रधान इथे आला होता. माझ्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारणही नवे होते. तेव्हा त्यांनी माझा सत्कार केला होता. तो सत्कार केवळ माझा नव्हता तर 140 कोटी भारतीयांचा होता. युएईतील प्रत्येक भारतीयाचा तो सत्कार होता. तो एक दिवस होता त्यानंतर आजचा एक दिवस आहे. पंतप्रधान झाल्यानंतर मी सातव्यांदा इथे आलोय,असे म्हणत पीएम मोदींनी 2015 च्या आठवणींना उजाळा दिला.
'अबूधाबीत एका मंदिरासाठी प्रस्ताव ठेवला आणि त्यांनी क्षणार्धात होकार दिला'
माझे भाग्य आहे की, युएईने त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले. हा केवळ माझाच सन्मान नाही. तर संपूर्ण भारत देशाचा सन्मान आहेत. आजही मी जेव्हा युएईच्या प्रमुखांना भेटतो तेव्हा ते भारतीयांचे कौतुक करतात. मी तुमच्याप्रती असलेले प्रेम अनुभवत असतो. मी अबूधाबीत एका मंदिरात प्रस्ताव ठेवला आणि त्यांनी क्षणार्धात होकार दिला. ज्या जमीनीवर तुम्ही रेष ओढचाल ती जमीन मी तुम्हाला देऊन टाकेन, असे ते मला म्हणाले, असेही मोदींनी स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या
MLA disqualification case : सर्वोच्च न्यायालयातील ठाकरे गटाच्या याचिकेवर आता थेट मार्चमध्ये सुनावणी