एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत पोहोचले
वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांच्या परदेश दौऱ्यात काल अमेरिकेतल्या वॉशिंगटनमध्ये पोहोचलेत. उद्या मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीत दहशतवाद तसंच एच 1 बी व्हिजामध्ये केलेल्या बदलांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. वॉशिंग्टन विमानतळावर मोदींचं जोरदार स्वागत करण्यात आलं.
पंतप्रधान अमेरिकेत दाखल झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करुन मोदींना खरा मित्र असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "सोमवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी व्हाईट हाऊसमध्ये भेट होईल. यावेळी अनेक सामरिक मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा होईल."
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या चार दिवसांच्या परदेश दौऱ्यात 25 आणि 26 जून रोजी अमेरिका दौऱ्यावर आहेत. उद्या सोमवार 26 जूनला ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेऊन, त्यांच्यासोबत स्नेहभोजन करणार आहेत. एखाद्या देशाच्या पंतप्रधानासोबत व्हाईट हाऊसमध्ये स्नेहभोजन करण्याची ट्रम्प यांची ही पहिलीच वेळ असेल. स्नेहभोजनादरम्यान दोघांमध्ये महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चाही होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं घेतल्यानंतर, पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींना अमेरिका भेटीचं निमंत्रण दिलं होतं. याशिवाय दोन्ही नेत्यांमध्ये आजपर्यंत तीनवेळा फोनवरुन विविध विषयांवर चर्चा झाली आहे. अमेरिकेने स्वत: ला पॅरिस करारापासून वेगळं केल्यानंतर मोदी आणि ट्रम्प यांची पहिल्यांदाच भेट असल्याने, या भेटीकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. कारण पॅरिस करारातून अमेरिकेने बाहेर पडण्याच्या निर्णयाची घोषणा करताना भारत आणि चीनवर निशाणा साधला होता. या करारातून अमेरिकेच्या एक्झिटचा सर्वाधिक फायदा भारत आणि चीनला होणार असून, या करारातील अटींमुळे अमेरिकेचं मोठं नुकसान झाल्याचं ते यावेळी म्हणले होते. याशिवाय H1-B व्हिसासंदर्भात अमेरिकेने कठोर भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवरही मोदी आणि ट्रम्प यांची भेट महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि पंतप्रधान मोदींची आठवेळा भेट झाली आहे. यात पंतप्रधान मोदींनी तीनवेळा अमेरिकेचा दौरा केला, यावेळी त्यांनी वॉशिंग्टनमध्ये ओबामांची भेट घेतली होती. तर 2015 मध्ये पंतप्रधान मोदींच्या निमंत्राणावर ओबामा भारतात आले होते.Look forward to welcoming India's PM Modi to @WhiteHouse on Monday. Important strategic issues to discuss with a true friend!
— President Trump (@POTUS) June 24, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सिंधुदुर्ग
Advertisement