एक्स्प्लोर
प्रिन्स विल्यम आणि केट यांना पंतप्रधानांतर्फे शाही भोजन
नवी दिल्ली : ब्रिटनचे प्रिन्स विल्यम आणि त्यांची पत्नी केट मिडलटन यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या शाही जोडप्याने पंतप्रधानांसोबत जेवणाचा आस्वादही घेतला.
'दिल्लीमध्ये रॉयल समर अवतरलं आहे. पंतप्रधानांनी हैदराबाद हाऊसमध्ये ड्यूक आणि डचेस ऑफ केंब्रिज यांचं यजमानपद भूषवलं' अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी ट्विटरवर दिली आहे.
https://twitter.com/MEAIndia/status/719794714820681728
प्रिन्स विलियम्स आणि केट यांनी स्नेहभोजनानंतर काझीरंगा नॅशनल पार्कलाही भेट दिली. सोमवारी इंडिया गेटवरच्या अमर जवान ज्योतीला पुष्पचक्र अर्पण केलं. त्यानंतर राजघाटवर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीवरही श्रद्धांजली वाहिली होती.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातील मोदींच्या ब्रिटन दौऱ्यात क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांनी पंतप्रधानांना लंचसाठी निमंत्रित केलं होतं. पुढच्या आठवड्यात असलेल्या एलिझाबेथ राणीच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त ब्रिटीश हायकमिशनरने सोमवारी रिसेप्शन आयोजित केलं होतं.
ब्रिटनचे राजपुत्र सपत्नीक मुंबईत, मास्टरब्लास्टरशी भेट
रविवारी मुंबईतल्या ताज हॉटेलला भेट देत उभयतांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. तसंच हॉटेल ताजमधील कर्मचाऱ्यांशी बातचीतही केली. त्यानंतर ओव्हल मैदानावर खेळण्यात येणाऱ्या एका क्रिकेट सामन्यालाही प्रिन्स विल्यम यांनी हजेरी लावली. यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपली पत्नी अंजलीसह मैदानावर हजर होता. दोघांची भेट हा अत्यंत आनंददायी अनुभव असल्याचं सचिन म्हणाला. प्रिन्स विल्यम्स आणि केट अत्यंत नम्र आणि साधे असल्याचंही मास्टरब्लास्टरने म्हटलंक्रि'केट'... पाहा शाही सूनबाईंचे फोटो :
सचिनच्या गोलंदाजीवर ब्रिटनच्या शाही सूनबाईंची बॅटिंग
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
जालना
मुंबई
Advertisement