Video: "मी आत्महत्या करणार नाही, माझ्या जीवाला बरे वाईट झाले तर...", फायजर अफरातफरी चव्हाट्यावर आणलेल्या व्हिसल ब्लोअरनं केला व्हिडिओ शेअर
फायजरच्या व्हिसलब्लोअर मेलिसा मैकएटी (Melissa McAtee) ने आपल्या जीवाला धोका असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओनंतर मोठी खळबळ उडाली आहे.
Pfizer whistleblower: बोईंगमधील अफरातफरी बाहेर काढणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर फायजरच्या व्हिसलब्लोअर मेलिसा मैकएटी (Melissa McAtee) ने आपल्या जीवाला धोका असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मेलिसा मैकएटीने आपल्या जीवीताला धोका असल्याचे म्हटले आहे. या व्हिडीओमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
फायजरची माजी मेलिसाने हा व्हिडीओ एक्स (पूर्वीचे ट्विटर) या माध्यमावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मेलीसा म्हणते की, मी आत्महत्या करणार नाही. माझ्या जीवाला धोका आहे. या व्हिडीओमध्ये मेलिसाने स्पष्ट केले आहे की, "माझ्या जीवाचे काही बर वाईट झाले तर त्याला जबाबदार फक्त आणि फक्त फार्मा कंपनी आणि सरकार आहे".
मेलीसाने फायजराच्या लसीबाबत केले होते मोठे खुलासे
व्हिडीओमध्ये मेलिसाने स्पष्ट केले आहे की, मी आत्महत्येचा प्रयत्न कधीही करणार नाही. माझे कौटुंबिक आयुष्य सुखी असून कोणतीही अडचण नाही. मेलिसाच व्हिल्सब्लोअर आहे, जिने वॅक्सीन बनवणारी कंपनी फायझरमधील लसीचा गैरव्यवहार चव्हाट्यावर आणला होता. तसेच कंपनीचे काही मेल देखील लिक केले होते. मेलिसाने फायजरच्या लसीमुळे शरीरावर होणारे परिणाम तसेच लोकांच्या मृत्यूबाबात चिंता व्यक्त केली होती.
काय म्हणाली मेलिसा?
मेलिसा म्हणाली, मी आयुष्य मजेत जगत असून कोणत्याही तणावात किंवा मानसिक दृष्ट्या स्वस्थ आहे . माझे माझ्या नवऱ्यावर आणि माझ्या मुलावर प्रेम आहे. माझ्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही, त्यामुळे मी आत्महत्येचा विचार देखील करु शकत नाही. माझ्या घरी देखील वातावरण चांगले आहे. जर माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला फार्मा कंपनी आणि सरकार जबाबदार असणार आहे. माझे कुटुंबीय जबाबदार असणार नाही.
I AM A PFIZER WHISTLEBLOWER
— Melissa McAtee (@MelissaMcAtee92) May 8, 2024
THE ONLY ONE ACTUALLY EMPLOYED AS A LONG TERM PFIZER EMPLOYEE
I AM TIRED.
I am tired of feeling like an imposter.
I am tired of feeling like I have no hope.
I am tired of fighting, debating, posting, researching..
But I am NOT suicidal. I have a… pic.twitter.com/NcSy9R2Hho
व्हिसलब्लोअर म्हणजे काय?
व्हिसलब्लोअर ही अशी व्यक्ती आहे जी पुढे येते आणि संस्थेमध्ये किंवा संस्थेच्या विशिष्ट विभागामध्ये घडत असलेल्या कोणत्याही चुकीच्या गोष्टीविषयी खुलासा करते. व्हिसलब्लोअर एक कर्मचारी, कंत्राटदार किंवा पुरवठादार जो गैरव्यवहार समोर आणतो.