Papua New Guinea : पापुआ न्यू गिनीमध्ये नरसंहार, दोन आदिवासी जमातीमध्ये झालेल्या हिंसाचारात 64 जण मृत्यूमुखी
Papua New Guinea Tribal violence : पापुआ न्यू गिनीमध्ये या घटनेनंतर आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. अॅम्बुलिन आणि सिकीन या दोन जमातीमध्ये हा हिंसाचार झाल्याची माहिती समोर येत आहे.
Papua New Guinea Tribal violence : इंडोनेशियाजवळील पॅसिफिक महासागर क्षेत्रातील पापुआ न्यू गिनी या देशात आदिवासी हिंसाचारात 64 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. पापुआ न्यू गिनीच्या उत्तरेकडील पर्वतीय भागात हा हिंसाचार झाला. या आदिवासी हिंसाचारात किमान 64 लोक मारले गेले असून या घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. पॅसिफिक समुद्री राष्ट्रामधील अलिकडच्या इतिहासातील सर्वात मोठा नरसंहार म्हणून या घटनेकडे पाहिलं जातंय.
रविवारी सकाळी एन्गा प्रांतातील वापेनमांडा जिल्ह्यात या नरसंहाराला सुरुवात झाली. पापुआ न्यू गिनीमध्ये या घटनेनंतर आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. अॅम्बुलिन आणि सिकीन या दोन जमातीमध्ये हा हिंसाचार झाल्याची माहिती समोर येत आहे.
WARNING: GRAPHIC CONTENT
— Reuters (@Reuters) February 19, 2024
Over 20 people died in tribal fighting in Papua New Guinea, the ABC reported, citing local police. Footage obtained by @Reuters showed a group of villagers in Enga Province carrying a dead body towards a parked ambulance https://t.co/vCvlLFMKrw pic.twitter.com/m95MgMcnHm
या हिंसाचारामध्ये अॅम्बुलिन आणि सिकीन जमातींचे शेकडो सदस्य हे जखमी झाल्याची माहिती आहे. सोमवारी सकाळपर्यंत हा हिंसाचार सर्वत्र पसरला होता. त्यानंतर 64 मृतदेह हाती लागले असून मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
Police retrieve 64 bodies after fighting breaks out between rival tribes in Papua New Guinea’s northern highlands.https://t.co/o4l8Aoqacb
— Al Jazeera English (@AJEnglish) February 19, 2024
मृतांचा आकडा वाढण्याची भीती
एका स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, प्रतिस्पर्धी गटांनी लढाईत AK47 आणि M4 सारख्या रायफलचा वापर केला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (ABC) ने सांगितले की या हिंसाचारात त्याच जमातींचा समावेश होता ज्या मागील वर्षी एन्गा प्रांतात झालेल्या संघर्षासाठी जबाबदार होत्या. मागील वर्षी झालेल्या हिंसाचारात 60 लोक मारले गेले होते.
या हिंसाचारानंतर देशातील लोक भयभीत झाले असून त्या सर्व लोक हे मानसिक तणावाखाली आहेत.
ही बातमी वाचा: