एक्स्प्लोर

Tata Satellite  : भारतीय लष्करासाठी टाटा समूहाने बनवला स्पाय सॅटेलाईट, इलॉन मस्कची कंपनी प्रक्षेपित करणार

Tata Spy Satellite : टाटा समूहाच्या कंपनीने भारतीय लष्करासाठी एक गुप्तचर उपग्रह विकसित केला आहे, जो एप्रिलमध्ये स्पेसएक्स रॉकेटच्या माध्यमातून प्रक्षेपित होणार आहे.

मुंबई : टाटा समूहाने भारतीय लष्कराच्या मदतीसाठी एक उपग्रह (Tata Spy Satellite) तयार केला आहे. एखाद्या खासगी कंपनीने तयार केलेला हा भारताचा पहिला लष्करी दर्जाचा गुप्तचर उपग्रह आहे. आता तो उपग्रह लवकरच अवकाशात सोडला जाणार असून इलॉन मस्कची कंपनी स्पेसएक्सच्या (SpaceX) रॉकेटमधून हा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये हा उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहे.

ग्राउंड स्टेशन बांधण्याचे काम सुरू

इकॉनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हा उपग्रह टाटा समूहाची कंपनी Tata Advanced Systems Limited (TASL) ने विकसित केला आहे. गेल्या आठवड्यात त्याची पूर्ण तयारी झाली होती. आता या उपग्रहासाठी ग्राउंड स्टेशन बांधण्याचे कामही पूर्ण होणार आहे. ग्राउंड स्टेशनवरूनच स्पाय सॅटेलाईटचे नियंत्रण केले जाईल आणि सब-मीटर रिझोल्यूशनची प्रक्रिया केली जाईल.

या क्षमतेने सुसज्ज उपग्रह

एप्रिलमध्ये स्पेसएक्सच्या रॉकेटद्वारे हा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. त्यासाठी हा उपग्रह फ्लोरिडाला पाठवला जात आहे. टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेडने लॅटिन अमेरिकन कंपनी सॅटेलॉजिकसोबत भागीदारी करून हा उपग्रह विकसित केला आहे. हा उपग्रह 0.5 मीटरपर्यंतच्या रेझोल्यूशनमध्ये छायाचित्रे घेऊ शकतो. यामुळे लष्कराला सीमेवर लक्ष ठेवण्यास आणि व्यूहात्मक लक्ष्य निश्चित करण्यास मदत होईल.

लष्कराच्या या गरजा पूर्ण केल्या जातील

चीनसोबतच्या सीमेवर तणाव वाढल्यानंतर सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय लष्कराच्या गरजा वाढल्या आहेत. सध्या लष्कराला सॅटेलाइट इंटेलिजन्ससाठी अमेरिकन कंपन्यांवर अवलंबून राहावे लागते. इस्रोकडे सब-मीटर रिझोल्यूशन उपग्रह देखील आहेत, परंतु ते सैन्याच्या गरजेसाठी पुरेसे असल्याचे सिद्ध होत नाहीत. कारण सैन्याला अनेकदा मोठ्या कव्हरेजची आवश्यकता असते आणि काहीवेळा ही गरज तातडीची असते. अशा स्थितीत या उपग्रहामुळे लष्कराचे परदेशी कंपन्यांवरील अवलंबित्व कमी होईल आणि डेटा लगेच उपलब्ध होईल.

बंगळुरूमध्ये नियंत्रण केंद्राचे बांधकाम सुरू

या उपग्रहावर नियंत्रण ठेवण्यासाठी बंगळुरूमध्ये एक नियंत्रण केंद्र बांधले जात आहे. या नियंत्रण केंद्रातूनच उपग्रहाला नियंत्रित केलं जाईल. यासोबतच सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा टार्गेट लॉक करण्यासाठी लष्कराला आवश्यक असलेल्या छायाचित्रांवरही नियंत्रण केंद्रात प्रक्रिया केली जाईल. गरज भासल्यास हा उपग्रह मित्र देशांनाही उपयोगी पडू शकतो.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कर्जदारांनो सावधान! कर्जाची परतफेड न केल्यास होणार मोठी कारवाई, RBI ने जाहीर केली कठोर नियमावली, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्जदारांनो सावधान! कर्जाची परतफेड न केल्यास होणार मोठी कारवाई, RBI ने जाहीर केली कठोर नियमावली, जाणून घ्या सविस्तर माहिती
Rohit Pawar: जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
West Bengal : ममता बॅनर्जी सरकार बरखास्त; राज्यपालांचा मोठा निर्णय, बंगालमध्ये भाजप सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा
ममता बॅनर्जी सरकार बरखास्त; राज्यपालांचा मोठा निर्णय, बंगालमध्ये भाजप सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा
West Bengal : धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी

व्हिडीओ

Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report
Mumbai Fish Market : मासळी बाजारातला राजकीय गोंगाट, भलतीच अफवा! Special Report
Eknath Shinde Breaking : एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका, मोठी दुर्घटना टळली
Sushma Andhare Pune : अदिती तटकरेंनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काय केलं? म्हणाल्या, झेपत नसेल तर राजीनामा द्या; सुषमा अंधारेंनी सुनावलं
Ambadas Danve PC : तोडफोड, मारहाण, मुडदे पडत असतील तर तृणमूलने एखाद्याचा मुडदा पाडला ते नैसर्गिक आहे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SSC Exam Result 2026 : दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपणार! राज्य मंडळाकडून दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार;  वाचा A टू Z माहिती
दहावीच्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपणार! राज्य मंडळाकडून दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार; वाचा A टू Z माहिती
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातली कार, सीसीटीव्हीत थरार
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातली कार, सीसीटीव्हीत थरार
Surya Kumar Yadav : 'सूर्या'च्या घरी अवतरली परी; सूर्यकुमार यादवला कन्यारत्न, कर्णधाराने दिली गुडन्यूज, IPL खेळणार की नाही? 
टीम इंडियाचा टी 20 कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या घरी अवतरली परी, पत्नी देविशानं दिला लेकीला जन्म 
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
Rohit Pawar: जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
West Bengal : धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
SSC Exam Result 2026 : दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
विधानसभेतील पराभवानंतर अखिलेश यादव CM ममता बॅनर्जींना भेटले; म्हणाले, तुम्ही हरलेल्या नाहीत
विधानसभेतील पराभवानंतर अखिलेश यादव CM ममता बॅनर्जींना भेटले; म्हणाले, तुम्ही हरलेल्या नाहीत
Embed widget