एक्स्प्लोर
बाप-लेकीच्या नात्यावर भाष्य करणारी जाहिरात व्हायरल
मुंबई : आपल्याकडे मुलींना म्हणावे तसे स्वातंत्र्य मिळालेले नाही. मुलीला आपले स्वप्न करण्यासाठी घरच्यांच्या विरोधात जावे लागते. पाकिस्तानसारख्या देशात तर याहूनही भीषण स्थिती आहे. तरुण मुलीला बुरख्याशिवाय घरा बाहेरही पडता येत नाही.
पण पाकिस्तानमधील एका स्मार्टफोन कंपनीने बाप-लेकीच्या नाते संबंधावर भाष्य करणारी जाहिरात तयार केली आहे. या जाहिरातीत मुलीला वडिलांच्या इच्छेविरोधात जावून क्रिकेटर बनण्याचे स्वप्न साकारताना दाखवण्यात आले आहे. मुलीच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे बापाला आपला विरोध बाजूला ठेवावा लागतो असे दाखविण्यात आले आहे.
जवळपास तीन मिनीटांच्या या जाहिरातीचा व्हिडिओ आजच्या फादर्स डे दिवशी मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
या जाहिरातीत सारा नावची मुलगी वडिलांच्या इच्छेविरोधात क्रिकेटर बनण्यासाठी घरातून निघते. एक महिन्याच्या प्रशिक्षणानंतर तिची पाकिस्तान क्रिकेट संघात निवड होते. यानंतर जेव्हा ती आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाला विजय मिळवून देते, तेव्हा तिचे वडील तिला फोन करून तिचे अभिनंदन करतात.
ही जाहिरात ज्या कंपनीने बनवली आहे, त्या कंपनीचे बोधवाक्य New Age. New Conversations असे आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
भारत
भारत
Advertisement