(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pakistan Products: संबंध ताणलेले तरीही... या पाकिस्तानी वस्तू वाढवतात भारतीय जेवणाची रूची
Pakistan Products in India: सुका मेवा आणि फळांच्या बाबतीत पाकिस्तान जगातील अनेक देशांच्या पुढे आहे. पाकिस्तानातील सुक्या मेव्याला जगातील अनेक देशांमध्ये मोठी मागणी आहे.
Pakistan Products in India : पाकिस्तानात (Pakistan) ऐतिहासिक महागाई झाली आहे. पाकिस्तानातील नागरिकांना दोन वेळचं जेवण मिळणंही कठीण झालंय. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती दुपट्टीने-तिपट्टीने वाढल्या आहेत. पाकिस्तानात पीठ, तेल, कांदा आणि डाळी यांसारख्या खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले आहेत. अर्थव्यवस्था ढासळली आहे. महागाईनं उच्चांक गाठला आहे. देशातील सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे, नोकऱ्या नाहीत... त्यामुळे पाकिस्तानमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेय. पाकिस्तान यावर कशी मात करणार, याकडे जगाचं लक्ष लागलेय. पाकिस्तानी रेल्वेकडेही केवळ काही दिवसांचे इंधन शिल्लक आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अशा काही गोष्टी पाकिस्तानमधून भारतात येतात ज्या प्रत्येक घरात वापरल्या जातात. आपण दैनंदिन जीवनात त्याचा वापर करतो. आज आपण पाकिस्तानमधून नेमक्या कोणत्या वस्तू भारतात येतात त्याविषयी जाणून घेणार आहोत.
सुकामेवा आणि फळे
सुका मेवा आणि फळांच्या बाबतीत पाकिस्तान जगातील अनेक देशांच्या पुढे आहे. पाकिस्तानातील सुक्या मेव्याला जगातील अनेक देशांमध्ये मोठी मागणी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताने 2017 मध्ये सुमारे 488.5 दशलक्ष डॉलर्स किंमतीच्या पाकिस्तानी वस्तू आयात केल्या होत्या. यामध्ये ड्रायफ्रुटस, टरबूज तसेच अनेक प्रकारची फळे पाकिस्तानातून आयात केली जात होती. पाकिस्तानात चांगल्या दर्जेदार फळांची चांगली आणि खूप मोठी बाजारपेठ आहे.
सैंधव (Rock Salt) मीठ ते सिमेंट
कदाचित तुम्हाला माहित नसेल की, सिमेंटचे उत्पादन पाकिस्तानमध्ये केले जाते आणि या सिमेंटला भारतात मोठी मागणी आहे. पाकिस्तानातील मीठ, दगड, चुना आणि सल्फर यांनाही भारतात मोठी मागणी आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, उपवासाच्या वेळी प्रत्येक घरात वापरण्यात येणारे सैंधव मीठ हे फक्त पाकिस्तानातून येते. भारतही पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात स्टील आणि तांबे खरेदी करतो. धातू आणि नॉन ऑरगॅनिक रसायनेही पाकिस्तानमधून आयात केली जातात.
पेशवारी चप्पलची वाढती मागणी
पाकिस्तानमध्ये तयार करण्यात येणाऱ्या कापसाला मोठी मागणी आहे. पाकिस्तानातील साखरेपासून बनवलेले कन्फेक्शनरी उत्पादनही देशात आयात केले जाते. लाहोरचे कुर्ते आणि पेशावरी चप्पल देखील भारतात प्रसिद्ध आहे. पाकिस्तानची मुलतानी मातीही जगभरात प्रसिद्ध आहे. चष्म्यांचे ऑप्टिकल्सही पाकिस्तानकडून चांगल्या प्रमाणात आणले जातात. पाकिस्तानातून येणारी अनेक चमड्याच्या उत्पादनांना भारतातही विक्री केली जाते.