बिथरलेल्या पाकिस्तानने हल्ला करताच दिल्लीत हलचालींना वेग, एस जयशंकरांनी अमेरिकेच्या सचिवांना फोन फिरवला,अमेरिकेचं उत्तर नेमकं काय?
IND VS PAK: जम्मू, पठाणकोट, जैसलमेर व पंजाबमधील होशियारपूरवर पाकिस्तानाच्या सैन्याने हवाई हल्ला चढवला असून भारतानेही पलटवार सुरू केला आहे. दरम्यान दुसरीकडे दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे.

Pakistan Drone Attack: ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. जम्मू, पठाणकोट, जैसलमेर व पंजाबमधील होशियारपूरवर पाकिस्तानाच्या सैन्याने हवाई हल्ला चढवला असून भारतानेही पलटवार सुरू केला आहे. दरम्यान दुसरीकडे दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेचे सेक्रेटरी मार्को यांना फोन फिरवला आहे. त्यांना पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याबाबत सांगितलं गेलं आहे. (IND vs PAK)
22 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या चिघळणाऱ्या परिस्थितीवर अमेरिकेने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी भारताने आम्हालाही हिंसाचार, व हल्ले नको आहेत मात्र पाकिस्तानने हल्ले केले तर त्याला आम्ही प्रत्युत्तर देऊ असं भारताने म्हटलं होतं.
परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेच्या सचिवांना फोन फिरवला
दरम्यान भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकन सेक्रेटरी मार्को रुबीओ यांच्याशी संवाद साधला आहे. यावेळी अमेरिकेचे सेक्रेटरी मार्को रुबीओ यांनी परिस्थितीची चिघळू देऊ नका असा आवाहन केलं आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याची तयारी अमेरिकेने दर्शवली आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतर या ठिकाणी ब्लॅक आऊट करण्यात आलाय. आता या संपूर्ण प्रदेशाचा ताबा लष्कराने घेतला आहे. भारताने आपली हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय करण्यात आली असून पाकिस्तानच्या लाहोरवर भारताच्या सैन्याने हल्ला सुरू केलाय. अमेरिकेने दाखवलेल्या पाठिंब्यावर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ट्विट पोस्ट करत आभारही मानले आहेत. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत काम करण्याच्या अमेरिकेच्या वचनबद्धतेचे मनापासून कौतुक. तणाव वाढवण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना कठोरपणे तोंड देऊ. असे ते या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
Spoke with US @SecRubio this evening.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) May 8, 2025
Deeply appreciate US commitment to work with India in the fight against terrorism.
Underlined India’s targeted and measured response to cross-border terrorism. Will firmly counter any attempts at escalation.
🇮🇳 🇺🇸
पाकिस्तानची दोन JF 17 विमाने पाडली
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला मोठा दणका दिलाय. भारताने पाकिस्तानचे दोन चिनी JF 17 लढाऊ विमानं पाडली आहेत. खुद्द पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यानेच याबाबत कबुली दिली. सतवारी, सांबा, आरएस पुरामध्ये पाकचा मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान पाकिस्तानचे सगळे हल्ले भारताने परतवून लावलेत.
हेही वाचा:
























