डेल्टापेक्षा ओमिक्रॉन अधिक धोकादायक? WHOनं सांगितल्या पाच महत्वाच्या गोष्टी
Omicron variant : दक्षिण आफ्रिकामध्ये आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटनं (B.1.1.529) जगाला पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडलं आहे.
![डेल्टापेक्षा ओमिक्रॉन अधिक धोकादायक? WHOनं सांगितल्या पाच महत्वाच्या गोष्टी Omicron More Dangerous Than Delta? WHOs Take In 5 Points डेल्टापेक्षा ओमिक्रॉन अधिक धोकादायक? WHOनं सांगितल्या पाच महत्वाच्या गोष्टी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/15/3d1cce6da42316bbc30c5bb7be15385c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Omicron variant : दक्षिण आफ्रिकामध्ये आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटनं (B.1.1.529) जगाला पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ओमिक्रॉन व्हेरिएंट अतिशय "चिंतेचा" ( concern) असल्याचे घोषित केले आहे. ओमिक्रॉन हा धोकादायक व्हेरिएंट मोठ्या प्रमाणात उत्परिवर्तन होतो . याशिवाय सुरुवातीच्या पुराव्यांवरून पुन्हा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटले आहे. नव्या व्हेरिएंटमुळे संपूर्ण जगभरातील देश सतर्क झाले असून हवाई वाहतूकीवर निर्बंध लावले आहेत. भारत, अमेरिकासह सर्वच देशांनी तयारी सुरु केली आहे. जगभरातील देश ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे चिंतेत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेनं याबाबत महत्वाच्या पाच गोष्टी सांगितल्या आहेत. पाहूयात काय आहेत त्या महत्वाच्या गोष्टी...
WHO च्या मते, सुरुवातीच्या पुरव्यात असं समोर आलेय की, जे लोक आधीच कोरोनाबाधित आहेत, ते पुन्हा ओमिक्रॉन व्हेरिएंटनं संक्रमित होऊ शकतात. ओमिक्रॉनमुळे पुन्हा संक्रमाणाची भीती आहे.
डेल्टा अथवा दुसऱ्या व्हेरिएंटच्या तुलनेत ओमिक्रॉनमुळे जास्त संसर्ग होत असल्याचं अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आतापर्यंत आरटीपीएसीआर टेस्टच्या आधारावरच ओमिक्रॉन व्हेरिएंट झालाय की नाही, हे समोर आलेय.
ओमिक्रॉन व्हेरिएंटचा कोरोना प्रतिबंधक लसीवर काय परिणाम होतो, यासाठी जागतिक आरोग्य संघटना काम करत आहे.
ओमिक्रॉनच्या संक्रमणामुळे अधिक गंभीर आजार होऊ शकतात की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच ओमिक्रॉन व्हेरिएंटची वेगळी लक्षणं असल्याचेही समोर आलेलं नाही.
दक्षिण आफ्रिकामधील रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं सुरुवातीच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झालेय. पण फक्त ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळेच रुग्णाची संख्या वाढत असल्याचेही समोर आलेलं नाही. इतर व्हेरिएंटचे आणि समूह संसर्गामुळेही रुग्णामध्ये वाढ झालेली असू शकते. ओमिक्रॉन व्हेरिएंटची गंभीरता समजण्यासाठी आणखी काही दिवस अथवा आठवडे लागू शकतात.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
संबधित बातम्या :
नवीन कोरोना व्हायरस 'चिंतेचा', WHOनं दिलं 'हे' नाव, धोका अधिक!
Omicron Variant : ओमिक्रॉनची सौम्य लक्षणं मात्र तरुणांना धोका अधिक; दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांचा दावा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)