(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kim Jong Un : किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त, उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
North Korea : उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनच्या भव्य महालातील काही इमारती उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावर हे वृत्त व्हायरल होत आहे.
Kim Jong Un Ryokpo Palace : उत्तर कोरियामध्ये (North Korea) सध्या मोठ्या घडामोडी घडत असल्याचं समोर आलं आहे. किम जोंग उनचा (Kim Jong Un) भव्य राजमहाल (Palace) उद्ध्वस्त करण्यात आला आहे. सॅटेलाईट फोटोंच्या आधारे ही बाब समोर आली आहे. काही तज्ज्ञांनी सॅटेलाईट फोटोंच्या आधारे दावा केला आहे की, उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनच्या राजमहालाच्या काही इमारती उद्धवस्त करण्यात आल्या आहेत. यामुळेच सध्या उत्तर कोरियामध्ये अनेक घडामोडी घडत असल्याचं बोललं जात आहे.
किम जोंग उनचा भव्य राजमहाल उद्ध्वस्त
किम जोंग उनच्या राजमहालामध्ये मोठा बदल घडल्याचं सॅटेलाईट फोटोंच्या आधारे समोर आलं आहे. काही तज्ज्ञांनी सॅटेलाईट फोटोंच्या आधारे दावा केला आहे, किम जोंग उनच्या एका राजमहालाच्या काही इमारती उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. किम जोंग उनच्या र्योक्पो पॅलेसच्या (Ryokpo Palace) काही इमारतींची मोडतोड झाल्याचं सांगण्यात येत आहे. उत्तर कोरियाचे विश्लेषक नोबडी जर्मन यांनी हा दावा केला आहे.
सॅटेलाईट फोटोंच्या आधारे मोठा दावा
उत्तर कोरियाचे विश्लेषक नोबडी जर्मन यांनी सॅटेलाईट फोटोचा आधार घेत दावा केला आहे की, उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनच्या र्योक्पो राजमहालाच्या काही इमारती उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. र्योक्पो राजमहालाची निळ्या रंगाच्या इमारत उद्ध्वस्त करण्यात आली आहे. सॅटेलाईट फोटोमध्ये आता ही इमारत दिसत होती. र्योक्पो राजमहाल उत्तर कोरियाची राजधामी प्योंगयांगच्या बाहेर आहे. र्योक्पो पॅलेस अतिशय सुंदर असल्याचं सांगितलं जातं.
उत्तर कोरियामध्ये मोठ्या घडामोडी
उत्तर कोरिया नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत येतो. या चर्चेचा मुख्य बिंदू हुकुमशाह किम जोंग उन हाच असतो. आता एका एक्स अकाऊंट @Nobodygerman वरून सॅटेलाइट फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे की, 'नवीन सॅटेलाइट दाखवतात की, किम जोंग उनचे र्योक्पो पॅलेसमधील काही इमारती हटवल्या जात आहे किंवा पुन्हा तयार केल्या जात आहे. 29 एप्रिलच्या सुमारास इमारती हटवण्याचं काम सुरू झालं, असंही सांगण्यात आलं आहे.
किम जोंगच्या राजमहालात लष्करी तळ?
उत्तर कोरियाच्या वृत्तवाहिनी एनके प्रोच्या वृत्तानुसार, न्यूजवीकने वृत्त दिले की मुख्य निवासी इमारती आणि आधारभूत संरचना 21 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान कधीतरी पाडल्या जाण्याची शक्यता आहे. एका तज्ज्ञाने न्यूजवीकला सांगितले की, इमारती पाडण्यात आल्याने या राजवाड्यात काही बदल झाले असावेत. लष्करी वापरासाठी येथे काही नवीन इमारती बांधता येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. हे किम जोंग उन यांच्या सशस्त्र दलांच्या अनुषंगाने असेल, कारण किम जोंग सतत आपल्या सैन्याचे आधुनिकीकरण करण्यात व्यस्त आहे.
किम जोंगचच्या बहीणीकडून संकेत?
तज्ज्ञांच्या मते, किम जोंग उनच्या राष्ट्रीय विकासात लष्कराला विस्तारित भूमिका देण्यासाठी किंवा लष्करी सुविधा मजबूत करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचं ठरु शकतं. दुसरीकडे, किम जोंग उनची बहीण किम यो जोंग हिने काही दिवसांपूर्वी या बदलाचे संकेत दिले होते, असंही सांगितलं जात आहे. काही आठवड्यांपूर्वी किम जोंग उनची बहीण किम यो जोंगने म्हटलं होतं की, देश आपले सार्वभौमत्व आणि प्रादेशिक शांततेचे रक्षण करण्यासाठी सर्वात मजबूत आणि मजबूत लष्करी शक्ती तयार करत राहील. या पार्श्वभूमीवर किम जोंग उन स्वतः आपल्या राजमहालात काही बदल करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :