एक्स्प्लोर

उत्तर कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची धमकी, या देशांना त्सुनामीचा धोका

हायड्रोजन बॉम्ब प्रशांत महासागरात टाकल्यास यामुळे मोठ्या लाटा तयार होऊ शकतात. ज्यामुळे त्सुनामाची धोका आहे. याचा परिणाम भारतावरही होऊ शकतो.

नवी दिल्ली : उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने प्रशांत महासागरात सर्वात शक्तीशाली हायड्रोजन बॉम्बस्फोटाची धमकी दिली आहे. हा हायड्रोजन बॉम्ब आण्विक बॉम्बपेक्षा अनेक पटींनी धोकादायक आहे. उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्ब प्रशांत महासागरात टाकल्यास अनेक देशांना त्सुनामीचा धोका आहे. हायड्रोजन बॉम्ब प्रशांत महासागरात टाकल्यास यामुळे मोठ्या लाटा तयार होऊ शकतात. ज्यामुळे त्सुनामाची धोका आहे. याचा परिणाम भारतावरही होऊ शकतो. संयुक्त राष्ट्र संघातील भाषणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला नेस्तनाबूत करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर उत्तर कोरियाने या धमकीची खिल्ली उडवत हायड्रोजन बॉम्ब टाकण्याची धमकी दिली. हायड्रोजन बॉम्बचा कोणकोणत्या देशांवर परिणाम होणार? जाणकारांच्या मते, उत्तर कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बने हल्ला केला जाऊ शकतो. लढाऊ विमानाद्वारे किंवा मिसाईलद्वारे प्रशांत महासागरात हा बॉम्ब टाकला जाऊ शकतो. यामुळे अमेरिकेशी चांगचे संबंध असणाऱ्या जपान आणि दक्षिण कोरियामध्ये त्सुनामी येऊ शकते. भारतावर काय परिणाम होणार? उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बस्फोट घडवून आणल्यास त्याचा भारतावरही परिणाम होणार का, हा प्रश्न सर्वांच्या मनात येणं स्वाभाविक आहे. हा प्रश्न यामुळे निर्माण होतो की, जपानमध्ये त्सुनामी आली तेव्हा भारतातही अलर्ट जारी करण्यात आला होता. तर इंडोनेशियामध्ये त्सुनामी आली त्यावेळी चेन्नईपर्यंत त्याचा परिणाम जाणवला होता. त्यामुळे उत्तर कोरियाच्या हायड्रोजन बॉम्बचा परिणाम भारतावरही होऊ शकतो. जगभरात आतापर्यंत 2 हजार पेक्षा जास्त वेळा आण्विक बॉम्ब स्फोट घडवून आणण्यात आला आहे. यापैकी 100 स्फोट समुद्रात घडवून आणण्यात आले. मात्र पर्यावरणाचं नुकसान टाळण्यासाठी 1963 साली यावर बंदी घालण्यात आली. समुद्रात स्फोट घडवून आणल्यामुळे भूकंप, त्सुनामी आणि भूस्खलनाचा धोका निर्माण होतो. मात्र हे स्फोट अशा ठिकाणी घडवून आणण्यात आले, जिथे कमी नुकसान होईल. उत्तर कोरियाला आण्विक बॉम्ब मिळवून देण्यात पाकिस्तानची मोठी भूमिका आहे. पाकिस्तानने उत्तर कोरियाकडून नोडोंग मिसाईलच्या बदल्यात आण्विक बॉम्बचं डिझाईन घेतलं होतं. यावेळी चीनने दोन्हीही देशांचं समर्थन केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?
अमेरिका आणि सौदी अरेबियाचे आता इराकमध्ये हवाई हल्ले; इराणने प्रत्युत्तरात अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, भीषण युद्धाला अचानक 'इराक वळण' कसं मिळालं?

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke on PM Modi: पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
पीएम मोदींच्या रात्री अकराच्या वेळेतील चौथ्या सेल्फी-स्टाईलवर अभिजित दिपकेंची खोचक कमेंट अन् जेन झीचा सुद्धा कमेंटचा पाऊस! नेमकं म्हणाले तरी काय?
Virar News: धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Amit Shah: देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
देशाच्या गृहमंत्र्याचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने बरबटलेले, त्यांच्या अंगावर विद्यार्थ्यांच्या रक्ताचे, अश्रूंचे शिंतोडे पडलेत; संजय राऊतांचा कडाडून प्रहार
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Embed widget