(Source: Poll of Polls)
New York Corona Update : न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा वाढता कहर, राज्यपालांकडून 'आरोग्य आणीबाणी' लागू
New York Corona Update : अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यानं चिंतेत भर पडली आहे. बिघडलेली परिस्थिती पाहता न्यूयॉर्कच्या राज्यपालांनी 'आरोग्य आणीबाणी' जाहीर केली आहे.
न्यूयॉर्क : अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यानं चिंतेत भर पडली आहे. बिघडलेली परिस्थिती पाहता न्यूयॉर्कच्या राज्यपालांनी 'आपत्ती आणीबाणी' जाहीर केली आहे. राज्यपालांनी न्यूयॉर्कमधील कोरोना संसर्गाचं वाढतं प्रमाणामुळे 'आरोग्य आणीबाणी' घोषित केली आहे. राज्यपालांनी आणीबाणी लागू करण्याचा आदेश जारी केला आहे.
आणीबाणी लागू करण्याच्या आदेशात त्यांनी म्हटलंय की, "मी, कॅथी हॉचूल, न्यूयॉर्क राज्याचा राज्यपाल म्हणून राज्यघटना आणि न्यूयॉर्क राज्याच्या कायद्यांद्वारे मला मिळालेल्या अधिकारांच्या आधारे, कलम 2-बीच्या कलम 28 नुसार कार्यकारी कायद्यानुसार, न्यूयॉर्क राज्यावर एक आपत्ती घोंघावत असल्याचं मला आढळलं आहे. या आपत्तीसाठी स्थानिक सरकार प्रभावी निर्णय प्रतिसाद देण्यात असमर्थ आहेत. त्यामुळे मी 15 जानेवारी 2022 पर्यंत संपूर्ण न्यूयॉर्क राज्यासाठी 'आरोग्य आणीबाणी' घोषित करतो."
न्यूयॉर्कमध्ये परिस्थिती बिघडली
विशेष म्हणजे अमेरिकेतील न्यूयॉर्कला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या 24 तासात येथे 5,785 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. न्यूयॉर्क राज्यात कोरोना संक्रमणाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सुमारे 58 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये आतापर्यंत एकूण 28 लाख रुग्ण आढळले आहेत, ज्यामधील सुमारे 23.26 लाख रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत, तर सध्या 4 लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत.
नियंत्रणात आली होती कोरोनाची परिस्थिती
मध्यंतरीच्या काळात न्यूयॉर्कमधील कोरोना विषाणूच्या संक्रमणाची परिस्थिती नियंत्रणात आली होती. मात्र, आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. रुग्णालयात भरती होणाऱ्या कोरोनारुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. ही परिस्थिती पाहता राज्यपाल कॅथी हॉचुल यांनी संपूर्ण न्यूयॉर्क राज्यात आणीबाणी लागू केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
-
Omicron Varient : नव्या 'Omicron' व्हेरिएंटवर लस प्रभावी नाही?, Pfizer, BioNTech चं मोठं विधान
-
Omicron Varient: नवीन व्हेरियंटची पुण्यालाही भीती? नव्यानं निर्बंध घालण्याबाबत अजित पवाराचं मोठं वक्तव्य
-
नवीन कोरोना व्हायरस 'चिंतेचा', WHOनं दिलं 'हे' नाव, धोका अधिक!