एक्स्प्लोर
मुलगी आणि जावयासह नवाज शरीफ यांना जामीन मंजूर
पनामागेट भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरल्यानंतर पाकिस्तानमधील सर्वसाधारण निवडणुकांपूर्वी नवाज शरीफ यांना तुरुंगात टाकण्यात आले होते.
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ, मुलगी मरीयम आणि जावई मोहम्मद यांना इस्लामाबाद हायकोर्टाने दिलासा दिला आहे. पनामागेट भ्रष्टाचारप्रकरणी नवाझ शरीफ यांना दहा वर्षांच्या, मरीयमला सात वर्षांच्या आणि सफदरला दोन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली होती. इस्लामाबाद हायकोर्टाच्या खंडपीठाने नवाज शरीफ आणि मुलगी मरीयम यांची हि शिक्षा स्थगिती देण्याचे आदेश बजावले आहे.
पनामागेट भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयाने 6 जुलै रोजी निर्णय देत शरीफ यांना दोषी ठरवले होते. पनामागेट भ्रष्टाचारप्रकरणी दोषी ठरल्यानंतर पाकिस्तानमधील सर्वसाधारण निवडणुकांपूर्वी नवाज शरीफ यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. पनामागेट प्रकरणात नवाज शरीफ यांच्याविरोधात तीन गुन्हे दाखल केले होते. यातील एक ब्रिटनमधील लंडनमध्ये असलेल्या एवेनफील्ड अपार्टमेंटशी निगडित आहे. याचप्रकरणी शरीफ यांना 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. सोबतच हे अपार्टमेंटही जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. पनामा पेपर्स काय आहे? पनामा पेपर्स सध्याचा जगभरात टॉप ट्रेडिंग टॉपिक आहे. पनामा येथील एका लॉ फर्मचे काही गोपनीय कागदपत्रे लीक करण्यात आली आहेत, त्यामुळे जगभरातील अतिश्रीमंत, बडे राजकारणी, देशांचे प्रमुख त्यांच्याकडील ब्लॅकमनी कसा सुरक्षित ठेवतात किंवा विदेशात पाठवतात याचा उल्लेख आहे. जगभरात व्हिसल ब्लोअर म्हणून चर्चेत आलेल्या एडवर्ड स्नोडेन यानेही हा आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट असल्याचा दावा केलाय. हा गौप्यस्फोट करण्यात एडवर्ड स्नोडेनचा मात्र काही सहभाग नाही. 11 दशलक्ष म्हणजे तब्बल एक कोटी दहा लाख पानांचा गोपनीय दस्तावेज या शोध पत्रकारांच्या हाती लागले. गेले वर्षभर जगभरातील अनेक शोध पत्रकार या मोहीमेवर काम करत होते. परदेशी पैसे पाठवणं हे बेकायदेशीर नाही, मात्र काही देशांचे प्रमुखच जेव्हा त्यांच्याकडील अतिरिक्त पैसा असा विदेशात छुप्या मार्गाने पाठवतात, तेव्हा नक्कीच संशयास्पद आणि आक्षेपार्ह असतं. यामध्ये 128 राजकारणी आणि बडे अधिकारी यांच्यासह तब्बल 12 देशांचे प्रमुखांचीही नावे आहेत. पनामा पेपर्समध्ये कोणाकोणाची नावं? जगभरातील अतीश्रीमंत सत्ताधीश, राजकारणी आणि उद्योगपती यांनी आपला ब्लॅकमनी कसा परदेशी पाठवला आहे, याचा खुलासा या पनामा पेपर्समधून करण्यात आलाय. जगभरातील हुकूमशहा आणि सत्ताधीशांच्या यादीत रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचंही नाव आहे. त्याशिवाय युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को, इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक, लिबियाचे मोहम्मद गडाफी, सिरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांचा समावेश आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांचे कुटुंबीय, आईसलँडचे पंतप्रधान तसंच सौदी अरेबियाचे राजे आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या काळ्या पैशाबाबत पनामा पेपर्समध्ये उल्लेख आहे.Islamabad High Court has suspended jail terms of former Pak PM Nawaz Sharif, his daughter Maryam Nawaz and son-in-law Captain (retd) Muhammad Safdar in Avenfield case: Geo News pic.twitter.com/LI56PGFsC6
— ANI (@ANI) September 19, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement