एक्स्प्लोर
अमेरिका, रशिया, जपान, पाकिस्तानच्या पंतप्रधानांची चोहोबाजूंनी कोंडी
न्यूयॉर्क: पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेदरम्यान विविध देशांच्या नेत्यांच्या भेटी घेऊन काश्मीरचा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना जगभरातील सर्वच नेत्यांकडून चोख प्रत्युत्तर मिळत आहे.
शरीफ यांनी अमेरिका, ब्रिटेन, जपान आणि तुर्की आदी नेत्यांशी चर्चा करुन काश्मीर मुद्द्यावर हस्तक्षेपाची मागणी केली. यासाठी त्यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि तुर्कस्थानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयप एर्दोआन यांची भेट घेऊन चर्चा केली. पण या भेटीतही त्यांच्या पदरी निराशाच आली.
शरीफ यांनी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांची भेट घेऊन काश्मीरसंदर्भात मगरीचे अश्रू ढाळले. शरीफ यांनी, काश्मीरमध्ये 107हुन अधिक नागरिकांची हत्या झाली असून, हजारो नागरिक जखमी झाले आहेत. तसेच राष्ट्रीय स्तरावरुनही मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे, असे सांगितले. त्यामुळे काश्मीरप्रश्नी हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केरी यांच्याकडे केली. त्याला केरींनीही नकार देत पाकिस्तानला चांगलेच फटकारले. केरी यांनी दहशतवादाला खतपाणी घालण्याचे उद्योग पाकिस्तानने बंद करावेत, अशा सज्जड दमच भरला आहे.
दुसरीकडे काश्मीरचा मुद्दा रेटण्याच्या प्रयत्नात असलेल्या शरीफांना सुयंक्त राष्ट्रसंघात मात खावी लागली आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांनी आपल्या शेवटच्या भाषणात काश्मीरच्या मुद्द्याचा नामोल्लेखही केला नसल्याने तिथेही त्यांच्या पदरी निराशा आली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही संयुक्त राष्ट्राच्या महासभेत बोलताना पाकिस्तानला चांगलेच फैलावर घेतले. ओबामांनी दहशतवादाला पाठबळ देण्याऱ्या देशांना इशारा देत,''जर दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या देशांनी आपल्या भूमिकेत वेळीच स्वत:मध्ये सुधारणा केल्या नाहीत. तर तो देशच दहशतवादाच्या भस्मासुराचा बळी ठरेल. यात अनेक निरपराधांना आपले जीव गमवावे लागतील. तसेच याची झळ शेजारील देशांनाही बसेल.'' असे म्हटले आहे.
दहशतवादाच्या मुद्द्यावरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची चांगलीच कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. अमेरिका, जर्मनी, इंग्लंड आणि फ्रान्स आदी प्रमुख देशांतील राजकिय तथा संरक्षण क्षेत्रातील जाणकारांनी पाकिस्तानला दोषी धरले आहे.
तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींची पाकिस्तानची कोंडी करण्याची रणिनीती यशस्वी होत असल्याचे चित्र आहे. रशियानेही पाकिस्तानला MI-35 हेलिकॉप्टर देणार नसल्याचे उरी हल्ल्यानंतर घोषित केले आहे. तसेच पुढील महिन्यात रशिया आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या एकत्रित युद्ध सरावालाही रशियाने नकार दिला आहे.
संबंधित बातम्या
पाकिस्तानला घेरण्यासाठी पंतप्रधान मोदींचा 'कमांडो प्लॅन'
पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी दिल्लीत रात्रभर खलबतं
पाकिस्तानला 'टेररिस्ट स्टेट' घोषित करण्यासाठी अमेरिकेत प्रस्ताव
अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दहशतवादावरुन पाकिस्तानला खडसावलं!
पाकला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटं पाडण्याच्या भारताच्या मोहिमेला पहिलं यश!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement