एक्स्प्लोर

DART Mission : पृथ्वीचा अवकाशातला 'रक्षक'! नासाचं 'मिशन डार्ट' यशस्वी; यानाची धडक देत लघुग्रहाची कक्षाच बदलली

Nasa DART Mission : नासा अंतराळ संस्थेने डार्ट मिशन यशस्वी केलं आहे. यामुळे भविष्यात पृथ्वीच्या दिशेने येणारे धोकादायक लघुग्रह नष्ट करता येतील किंवा त्यांची दिशा बदलता येईल. काय आहे डार्ट मिशन? वाचा

Nasa DART Mission : पृथ्वीचा विनाश टाळण्यासाठी नासानं (NASA) आज एक मोठी मोहिम फत्ते केली आहे. पृथ्वीला ॲस्ट्रॅायडच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी नासानं 'डार्ट मिशन' (DART Mission) यशस्वीरित्या राबवलं आहे. या मिशन अंतर्गत नासाचं डबल ॲस्ट्रॅायड रीडायरेक्शन स्पेसक्राफ्ट (Double Asteroid Redirection Test) उल्केवर आदळलं आहे. नासानं अवकाशात फिरणाऱ्या डायमॅारफस (Dimorphos) लघुग्रह आणि अंतराळयानची टक्कर घडवून आणली आहे. अवकाशातील लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास पृथ्वीला मोठा धोका उद्भवू शकतो. अशा उल्का म्हणजेच लघुग्रहांची टक्कर पृथ्वीच्या विनाशाला कारणीभूत ठरु शकते. हे टाळण्यासाठी नासाकडून प्रयत्न सुरु आहेत. त्याचा एक भाग म्हणजे ही एक चाचणी होती. त्यामुळे नासाचं हे मिशन फार महत्त्वाचं होतं आणि ते यशस्वी झालं आहे. डायमॅारफस (Dimorphos) नावाच्या लघुग्रहाशी या डार्ट अंतराळयानाची टक्कर झाली. 

डार्ट अंतराळयानाला धडकलेल्या लघुग्रहाची लांबी 169 मीटर होती. या धडकेमुळे लघुग्रहाची दिशा आणि वेग बदल्यात मदत झाली. अमेरिकन अंतराळसंस्था नासाची ही मोहीम यशस्वी झाल्याने आता भविष्यात पृथ्वीच्या दिशेने येणारे धोकादायक लघुग्रह नष्ट करता येतील किंवा त्यांची दिशा बदलता येईल.

भविष्यात लघुग्रह नष्ट करण्यासाठी होणार मदत

नासाने आज पहाटे ही मोहीम यशस्वी केली. भारतीय वेळेनुसार, 27 सप्टेंबर 2022 रोजी पहाटे 4.45 वाजता डार्ट अंतराळयानाची डायमॅारफस (Dimorphos) ॲस्ट्रॅायडसोबत टक्कर झाली. यामध्ये नासाचं अंतराळयान नष्ट झालं आहे. पण ॲस्ट्रॅायडचा वेग आणि दिशा बदलण्यात नासाला यश आलं आहे. नासानं ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 

नासा अंतराळ संस्थेने पृथ्वीला लघुग्रहापासून वाचवण्यासाठी यशस्वी चाचणी घेतली आहे. याला डार्ट मिशन असं नाव देण्यात आलं होतं. प्लॅनेटरी डिफेन्स सिस्टम (DART) मोहीम यशस्वीपणे पूर्ण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याचा फायदा भविष्यात कोणताही लघुग्रह नष्ट करण्यासाठी केला जाऊ शकतो. नासाला पृथ्वीच्या जवळ अंतराळ फिरणारे 8000 निअर अर्थ ऑब्जक्ट्स (NEO) आढळले आहेत. हे ॲस्ट्रॅायड म्हणजे लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास पृथ्वीचा विनाश होऊ शकतो.  

काय आहे डार्ट मिशन? (What is Dart Mission) 

पृथ्वीला अवकाशात फिरणाऱ्या लघुग्रहांपासून मोठा धोका आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासाला पृथ्वीच्या दिशेने येणार्‍या धोकादायक लघुग्रहाची दिशा बदलता येईल का याची चाचणी करायची होती. यासाठी नासाने डार्ट मिशान हाती घेतलं. त्या अंतर्गत ही पहिली डबल ॲस्ट्रॅायड रीडायरेक्शन चाचणी यशस्वी झाली आहे. दररोज अनेक लहान-मोठे लघुग्रह आपल्या पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करतात. यापैकी बहुतेक वातावरणाच्या घर्षणाने नष्ट होतात. पण अनेक लघुग्रह अजूनही अवकाशात अस्तित्वात आहेत, जे पृथ्वीसाठी धोकादायक आहेत. या लघुग्रहांना नष्ट करण्यासाठी नासाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या

NASA DART Mission : पृथ्वीला वाचवण्याची मोहीम यशस्वी! ॲस्ट्रॉयडवर आदळले नासाचे अंतराळ यान 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Aaditya Thackeray Majha Vision : राज ठाकरेंसह युती का होत नाही? आदित्य ठाकरे पहिल्यांदाच बोललेAaditya Thackeray Majha Vision : मला शिंदेगटाकडून निरोप आला...गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोलाAaditya Thackeray Majha Vision : काकाचं दिल्लीत वाका झालंय... एकनाथ शिंदेंवर ठाकरेंचा टोलाAaditya Thackeray Majha Vision : Eknath Khadse यांचा फोन आला...म्हणाले,

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
Marathi Serial Updates Zee Marathi :  'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या'  अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
'लागिरं झालं जी'मधला आज्या परत येतोय, 'या' अभिनेत्रीसोबत झळकणार; 'झी मराठी'वर नवी मालिका
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
घरी मुलीच्या लग्नाची तयारी अन् पेट्रोल पंपावर वडिलांवर काळाचा घाला, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत टॅक्सी चालकाचा दुर्दैवी मृत्यू
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
3 जागा, 6 संघ... प्लेऑफची स्पर्धा रंजक; CSK, RCB की SRH कुणाची वर्णी? पाहा नेमकं समीकरण
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
प्लेऑफमध्ये कोणते संघ, चेन्नई की आरसीबीला स्थान मिळणार, भज्जी-कैफनं कुणाला दिली पसंती? 
Embed widget