एक्स्प्लोर
मुंबईतून 12 वर्षांपासून बेपत्ता, नबी शेखला पाकिस्तानात अटक

मुंबई: मुंबईतून मागच्या १२ वर्षांपासून बेपत्ता असलेला व्यक्तीला पाकिस्तानमध्ये अटक केली गेल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शेख नबी असं त्या व्यक्तीचं नाव असून तो मूळ मुंबईतल्या जोगेश्वरी या भागात राहत होता. पाकिस्तानमधल्या इस्मालाबादेत नबी शेखला अटक करण्यात आली आहे. नबी शेखकडे काही महत्वाच्या कागदपत्रांची पूर्तता नसल्यानं त्याला अटक झाली असावी असा अंदाज बांधला जातो आहे. त्यामुळे मुंबईत राहणारे शेखचे कुटुंबीय चिंतेत आहेत. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील F-8 भागातून त्याला अटक करण्यात आली आंतरराष्ट्रीय कोर्ट (आयसीजे)ने पाकला कुलभूषण जाधवांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यानंतर दोनच दिवसात पाकने आणखी एका भारतीय नागरिकाला अटक केली आहे. संबंधित बातम्या: पाकिस्तानात भारतीय नागरिकाला अटक, पासपोर्ट नसल्याचा दावा
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
व्यापार-उद्योग
क्रिकेट























