(Source: ECI/ABP News/ABP Majha)
म्यानमारच्या आंग सान सू की यांच्या पक्षातील दोन सदस्यांना तब्बल 90 आणि 75 वर्षांची कैद
म्यानमारच्या कोर्टाने म्यानमारमधील बड्या नेत्या आंग सान सू की (Aung San Suu Kyi) यांच्या पक्षामधील दोन नेत्यांना 90 वर्ष आणि 75 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.
Myanmar : म्यानमारच्या कोर्टाने म्यानमारमधील बड्या नेत्या आंग सान सू की (Aung San Suu Kyi) यांच्या पक्षामधील दोन नेत्यांना 90 वर्ष आणि 75 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. याप्रकरणी दोषी सिद्ध झाल्यानंतर ही शिक्षा सुनावली आहे. याबद्दल एका वकिलांनी माहिती दिली आहे. आंग सान सू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी पार्टीमधील हे दोघे महत्वाचे सदस्य आहेत. या दोन सदस्यांना 1 फेब्रुवारी रोजी म्यानमारच्या लष्कराद्वारे सत्ता मिळवल्यानंतर अटक करण्यात आली होती.
वकिल जॉ मिन हलिंग यांनी सांगितले की, कायिन राज्याचे माजी योजना मंत्री थान नैंग (Than Naing) यांना मंगळवारी राज्य न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या सहा आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आले आणि त्यांना 90 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. 67 वर्षीय नेत्या नांग खिन हत्वे म्यिंत (Nang Khin Htwe Myint) यांना पाच आरोपांवर प्रत्येकी 15 वर्ष म्हणजेच 75 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. नांग खिन हत्वे म्यिंत या कायिन राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि आंग सू की यांच्या राजकीय पक्षाच्या सर्वोच्च सदस्य होत्या. आंग सान यांच्यावर देखील भ्रष्टाचार आणि इतर गुन्हेगारी आरोपांबाबतचा खटला सुरू आहे. त्यांच्या समर्थकांचे मतं आहे की, त्यांची बदनामी करण्यासाठी त्यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत.
Malala Yousafzai Marriage : नोबेल पुरस्कार विजेती मलालाचा विवाह सोहळा; बर्मिंघममध्ये बांधली लग्नगाठ
आंग सान सू की यांच्यावरील आरोप जर खरे ठरले तर त्या भविष्यात कधीच निवडणूक लढवू शकणार नाहीत. मान्यमारमध्ये 2023 पर्यंत निवडणुका घेण्याबद्दल सांगितले आहे. पक्षाच्या केंद्रीय कार्यकारी समितीच्या सदस्य असलेले नांग खिन हत्वे म्यिंत या लोकशाहीचे समर्थन करणाऱ्या अनुभवी नेत्या आहेत. त्या यांग सान सू की यांच्या जवळच्या सहकारी आहेत. 2017 मध्ये म्यिंत यांचा अपघात झाला होता. त्यावेळी उपचारा दरम्यान त्यांच्यावर देशाच्या संपत्तीचा दुरूपयोग करण्याचा आरोप करण्यात आला. या आरोपात त्या दोषी ठरल्या. याशिवाय इतर चार प्रकरणांमध्ये म्यिंत आणि नैंग यांना पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे.