एक्स्प्लोर
Advertisement
श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट, शंभरहून अधिक नागरिकांचा मृत्यू, शेकडो जखमी
कोलंबोच्या चर्चमध्ये या बॉम्बचा धमाका एवढा मोठा होता की त्यामुळे चर्चचे छत उडून गेले आहे. जखमींना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यात विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे.
कोलंबो : श्रीलंकेची राजधानी कोलंबो साखळी बॉम्बस्फोटाने हादरली आहे. कोलंबोमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात आतापर्यंत 185 नागरिक मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे तर तीनशेहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. राजधानी कोलंबोत ईस्टर संडेचा उत्सव सुरु असताना झालेल्या या बॉम्बस्फोटांनी श्रीलंका देश हादरला आहे.
येथील 3 चर्च आणि 3 फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये एकूण 6 बॉम्बस्फोट झाले आहेत. ज्यामध्ये दीडशेहून अधिक नागरिक ठार झाले असून, तीनशेहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यात विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. या ठिकाणी आता सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, कोणत्याही दहशतवादी संघटनेनं अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही.
हॉटेल शांग्रीला, हॉटेल किंग्सबरी आणि हॉटेल सिनामन या तीन हॉर्लटेसह सेंट ऍंथोनी, सेंट सेबास्टिन, सेंट बट्टीकलोआ या तीन चर्चमध्ये हे ब्लास्ट झाले.
कोलंबोतील कोच्छिकाडे आणि काटुवापिटिया येथील चर्चमध्ये स्फोट झाले आहेत. कोलंबोच्या चर्चमध्ये या बॉम्बचा धमाका एवढा मोठा होता की त्यामुळे चर्चचे छत उडून गेले आहे.
ईस्टर संडे सणानिमित्त चर्चमध्ये यावेळी प्रार्थना सुरु होती. सर्वात पहिला धमाका हॉटेल शांग्रीलामध्ये झाला. दरम्यान मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी श्रीलंकेतील भारतीयांसाठी +94777903082 हा हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. कोलंबोतील परिस्थितीवर आमचे लक्ष असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
Explosions have been reported in Colombo and Batticaloa today. We are closely monitoring the situation. Indian citizens in need of assistance or help and for seeking clarification may call the following numbers : +94777903082 +94112422788 +94112422789
— India in Sri Lanka (@IndiainSL) April 21, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
विश्व
परभणी
Advertisement