एक्स्प्लोर
Coronavirus | जगभरात कोरोना बाधितांचा आकडा 12 लाख पार; 47 हजारापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू
जगभरात कोरोना व्हायरसचा कहर वाढतच जात असून जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा 12 लाख पार पोहोचला आहे.
नवी दिल्ली : जगभरात कोरोनामुळे बळी पडलेल्यांची संख्या 65 हजारावर गेली आहे. आतापर्यंत जगभरात 12 लाखापेक्षा अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जगात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून आतापर्यंत 190 देशांमध्ये पसरला आहे, आतापर्यंत कोरोनाचे 2 लाखाहून अधिक रूग्ण बरे झाले आहे. सध्या जगात नऊ लाख जण कोरोनाबाधित असून त्यातील पाच टक्के म्हणजे 42, 288 रूग्ण गंभीर आहे.
अमेरिका
अमेरिकेत शनिवारी (4 एप्रिल) कोरोनामुळे 1048 जणांनी जीव गमावला असून एकूण मृतांचा आकडा 8,452 आहे. अमेरिकेत तीन लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनपेक्षा जास्त बळी एकट्या न्यूयॉर्कमध्ये गेले आहे. न्यूयॉर्क शहरात सर्वाधिक 1 लाख 15 हजार रुग्ण आहेत. तिथे 3,565 लोकांनी जीव गमावला आहे. त्या खालोखाल न्यूजर्सीत 846 , मिशिगनमध्ये 540, लुईझियाना 409, वॉशिंग्टनमध्ये 314, तर कॅलिफोर्निया 131 लोकांचा बळी गेला आहे.
1 एप्रिल – 1049
2 एप्रिल - 969
3 एप्रिल - 1045
4 एप्रिल -1331
एप्रिल महिन्याच्या पहिल्या चारचं दिवसात अमेरिकेत तब्बल 4 हजार 394 लोकांचा कोरोनामुळे बळी गेला.चीनने अमेरिकेला एक हजार व्हेन्टीलेटर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अमेरिकेतील आरोग्य यंत्रणेवरील ताण काहीसा कमी होईल असं मानलं जात आहे.
फ्रान्स
फ्रान्सने काल दिवसभरात 1053 लोक गमावले. आत्तापर्यंत 7560 बळी गेला असून एकूण रुग्ण 90 हजारावर गेली आहे.
स्पेन
कोरोनाबाधितांच्या संख्येत स्पेनने इटलीला मागे टाकलं आहे. रुग्णांच्या संख्येत सात हजारांची भर पडली असून तिथे आता 1 लाख 26 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहे. स्पेनने गेल्या चोवीस तासात 749 लोक गमावले. तिथे मृतांचा आकडा 11, 947 आहे. चीनपेक्षा जास्त लोक गेल्या चार दिवसात गमावले आहे.
इटली
काल दिवसभरात इटलीने तब्बल 681 माणसं गमावली आहे. आता इटलीतील एकूण बळींची संख्या 15 हजार 362 असून त्यातील 8 हजारावर मृत्यू उत्तर इटलीतील लोम्बार्डी प्रांतात झाले आहे. काल रुग्णांची संख्या सव्वा पाच हजारांनी वाढली असून इटलीत आता जवळपास 1 लाख 24 हजार रुग्ण आहेत.
Coronavirus Update | जगभरात 12 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण
इंग्लंडने काल 708 लोक गमावले असून तेथील बळींचा आकडा 4313 वर पोहचला आहे. इराणने चीनला मागे टाकले असून तिथे बळींच्या संख्येत 158 ची भर पडली आहे. आतापर्यंत एकूण 3452 जणांचा मृत्यू झाला असून रुग्णांची संख्या 56 हजारावर गेली आहे. जर्मनीत काल 169 जणांची भर पडली. इटलीत कोरोनाचे 1444 बळी गेले आहे. तर कोरोनाने हॉलंडमध्ये काल 164 बळी घेतले तिथे एकूण 1651 लोक दगावले आहेत. बेल्जियममध्ये काल 140 मृत्यूमुखी पडले असून एकूण बळींचा आकडा 1283 वर गेला आहे.
स्वित्झर्लंडमध्ये 666, स्वीडनमध्ये 373, ब्राझील 445, पोर्तुगाल 266, इंडोनेशिया 191 तर टर्कीत 501 बळी गेले आहेत. दक्षिण कोरिया मृतांच्या आकड्यात शनिवारी (4 एप्रिल) ३ जणांची भर पडली आता मृतांचा आकडा 177 आहे. तर जपानमध्ये काल 8 बळी गेले असून मृतांचा एकूण आकडा 77 आहे.पाकिस्तानात रुग्णांची संख्या 2818 वर पोहचली आहे. कोरोनाने तिथे 41 जणांचा बळी घेतला आहे.
चीन
चीन मध्ये शनिवारी (4 एप्रिल) फक्त 30 नवे रुग्ण आढळले तर 3 लोक मृत्यूमुखी पडले. चीनमध्ये मृतांचा आकडा 3329 आहे. आतापर्यंत 81669 रुग्णांपैकी 76 हजार 964 बरे झाले आहेत. आतापर्यंच फक्त 1376 रुग्ण आहेत त्यातले फक्त 295 जण गंभीर आहे. गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 84 हजारांची तर बळींच्या आकड्यात 5500 ची भर पडली आहे.
संबंधित बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
मुंबई
महाराष्ट्र
रत्नागिरी
Advertisement