एक्स्प्लोर
#Corona | गरीब देशांचं कर्ज माफ करावं, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जगभरातील 300 लोकप्रतिनिधींची मागणी
कोरोनाचा धोका जगभरातील लाखो-कोटी लोकांना आहे. यामुळं गरीबी वाढणार आहे तसंच बेरोजगारी वाढणार आहे. यामुळं अनेकांच्या एकवेळचा जेवणाचा प्रश्नही वाढणार आहे.
नवी दिल्ली : कोविड 19 अर्थात महामारीच्या संकटाचा विचार करता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने गरीब देशांचं कर्ज माफ करुन टाकावं, अशी विनंती जगभरातील 300 लोकप्रतिनिधींनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला (International Monetary Fund) केली आहे. 2016 साली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार शर्यतीत असणारे बर्नी सँडर्स आणि इल्हाम ओमर यांनी या कामासाठी पुढाकार घेतला आहे.
जगात कोरोनाचं थैमान सुरु आहे. लॉकडाऊनमुळे अनेक देशातील सगळे व्यवसाय, दैनंदिन जीवन ठप्प आहे , जगाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. यात गरीब सर्वात जास्त भरडला जात आहे. त्यातही गरीब देशांचे जास्त हाल आहेत. कुचकामी आरोग्य व्यवस्था, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली अर्थव्यवस्था यातून फार पर्याय शिल्लक नाहीत त्यामुळे त्यांचं कर्ज माफ करावं अशी मागणी केली जात आहे.
हातात असलेला पैसा कर्जाचे हफ्ते फेडण्यात घालवण्यापेक्षा आपल्या जनतेची काळजी घेण्यासाठी खर्च होणं जास्त गरजेचं असल्याचं बर्नी सँडर्स यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा धोका जगभरातील लाखो-कोटी लोकांना आहे. यामुळं गरीबी वाढणार आहे तसंच बेरोजगारी वाढणार आहे. यामुळं अनेकांच्या एकवेळचा जेवणाचा प्रश्नही वाढणार आहे.
Corona World Update | जगभरात कोरोनाबाधितांची संख्या 43 लाखांवर, 16 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक किंवा इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनी किमान अशा गरीब देशांचं कर्ज माफ करुन आपला छोटासा वाटा उचलायला हवा असं मत त्यांनी मांडलंय.
गरीब देशांनी शक्य ती मदत पुरवायचा प्रयत्न असेल मात्र कर्ज माफ केलं तर त्या देशांचीच आर्थिक पत, रेटिंग घसरेल आणि त्यांना अत्यल्प दरात निधी उपल्ब्ध करुन द्यायला मर्यादा येतील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटलं आहे.
सहा खंडातील 24 देशातील खासदार/ लोकप्रतिनिधींनी यासाठीचं पत्र आयएमएपला पाठवलं आहे. या पत्रानंतर आयएमएफ आपली भूमिका बदलून गरीब देशांना दिलासा देईल का याकडे सर्वांचं लक्ष असेल.
जगभरात कोरोनाचे 43 लाख 35 हजार रुग्ण
जगभरातील 212 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 43 लाख 35 हजार रुग्ण झाले आहेत. तर कोरोनामुळं गेलेल्या बळींची संख्या दोन लाख 92 हजारांवर गेली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख 92 हजार 815 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 16 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 73 टक्के कोरोनाबाधित हे केवळ दहा देशांमध्ये आहेत. या दहा देशांमध्येच 30 लाखांजवळ कोरोना रुग्ण आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement