एक्स्प्लोर
वोग इंडियाच्या कव्हर पेजवर झळकलेल्या मॉडेलची आत्महत्या?

ढाका: मालदिवची नागरिक आणि मॉडेल असलेली रौधा आतिफ हिचा बांगलादेशमधील राजशाही शहरातील मेडिकल कॉलेज रुग्णालयातील वसतिगृहात तिचा मृतदेह आढळून आला आहे. रौधा आतिफ ही मॉडेलिंगही करत होती. आंतरराष्ट्रीय मासिक वोग इंडियाच्या ऑक्टोबर 2016च्या कव्हर पेजसठी रौधानं फोटोशूट केलं होतं. प्रथमदर्शी रौधानं आत्महत्या केली असावी असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे. 20 वर्षीय रौधा अतिफ ही मेडिकल कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षाला होती. बुधवारी 11 वाजेपर्यंत ती तिच्या रुमबाहेर न आल्यानं तिच्या मैत्रिणींनी तिच्या रुममध्ये जाऊन पाहिलं त्यावेळी ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. दरम्यान, रौधा हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून त्यानंतरच तिच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकेल. तिच्या मृत्युबाबत ढाकातील मालदिवच्या दूतावासाला माहिती देण्यात आली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
सांगली
महाराष्ट्र
राजकारण























