एक्स्प्लोर
खगोलप्रेमींना 'मंगल' संधी, मंगळ ग्रह पृथ्वीच्या सर्वात जवळ
मंगळ ग्रह आज पृथ्वीपासून पाच कोटी 75 लाख किलोमीटर अंतरावर असेल.

(फोटो : गुगल)
मुंबई : 2018 या वर्षात आपल्याला खगोलशास्त्रीयदृष्ट्या दुर्मिळ असलेल्या अनेक घटना अनुभवण्याची संधी मिळत आहे. मंगळ ग्रह आज पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ येणार असल्यामुळे सर्वांना प्रखरपणे पाहता येणार आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच सुपरमून आणि ब्लूमून पाहण्याची संधी खगोलप्रेमींना मिळाली होती. त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी शतकातलं सर्वाधिक काळ चाललेलं खग्रास चंद्रग्रहण (ब्लड मून) आपण अनुभवलं. आता मंगळ ग्रह पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असेल. मंगळ ग्रह आज पृथ्वीपासून पाच कोटी 75 लाख किलोमीटर अंतरावर असेल. इतर वेळी तो पृथ्वीपासून तब्बल 40 कोटी 10 लाख किलोमीटर अंतरावर असतो. मात्र आता मंगळ जवळ आल्यामुळे निरभ्र आकाशात तो ठळकपणे पाहता येईल. 27 जुलै रोजी अवकाशातील स्थितीनुसार मंगळ आणि सुर्याच्या मधोमध पृथ्वी होती. आता ऑगस्ट 2003 नंतर 15 वर्षांनी मंगळ पृथ्वीच्या सर्वाधिक समीप असेल. 6 ऑगस्ट 2020 रोजी दोन ग्रह पुन्हा एकमेकांच्या सर्वाधिक जवळ येतील.
आणखी वाचा























