एक्स्प्लोर
Advertisement
लंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ला, 6 मृत्यूमुखी
लंडन : शनिवार लंडनवासियांसाठी घातवार ठरला आहे. ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले करण्यात आले आहेत. प्रशासनानं अधिकृतरित्या या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या दहशतवादी हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू तर जवळपास 48 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
प्रसिद्ध लंडन ब्रिजवर एका भरधाव कारनं फूटपाथवरुन चालणाऱ्या पादचाऱ्यांना चिरडलं आहे, तर दुसऱ्या घटनेत लंडन ब्रिजजवळील एका हॉटेलमध्ये एका व्यक्तीनं त्याठिकाणी खात असलेल्या ग्राहकांवर चाकूहल्ला केला आहे. या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तर अन्य एका घटनेत वॉक्सहॉल परिसरात गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
https://twitter.com/metpoliceuk/status/871135916047388672
दरम्यान या हल्ल्यानंतर लंडन ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तसंच आसपासचे महत्त्वाचे रस्तेही बंद करण्यात आले. लंडन ब्रिज परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी या हल्ल्यामुळे अडकलेल्या लोकांना मदतीसाठी हात पुढे केला आहे.
https://twitter.com/realDonaldTrump/status/871145660036378624
या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण ब्रिटनसोबत असून लागेल ती मदत करण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement