एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कुलभूषण जाधवप्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी
नवी दिल्ली : कुलभूषण जाधवप्रकरणी आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी आहे. पाकिस्तानने भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपांवरुन फाशीची शिक्षा सुनावली होती.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय न्यायलयाचा हा निर्णय पाकिस्तान मान्य करणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण पाकिस्तानने या निर्णयाविरोधात याचिकाही दाखल केली आहे. ज्यावर आंतरराष्ट्रीय कोर्टात आज सुनावणी होणार आहे.
कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती
सुनावणीदरम्यान भारताने पाकिस्तानवर व्हिएन्ना करारचं उल्लंघन केल्याचा आरोप करत, कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली.
कोण आहेत कुलभूषण जाधव?
कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती. जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत.
जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे. ‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement