एक्स्प्लोर
प्रिन्स विल्यम आणि केट यांच्याकडे तिसऱ्यांदा पाळणा हलणार
डचेस ऑफ केंब्रिज केट मिडलटन पुन्हा एकदा आई होणार आहे. केन्सिंग्टन पॅलेसने याबाबत घोषणा केली आहे

लंडन : केंब्रिजचे ड्यूक आणि डचेस अर्थात प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांच्याकडे पुन्हा एकदा गुड न्यूज आहे. केट आई होणार असल्याचं अधिकृत वृत्त केन्सिंग्टन पॅलेसने दिलं आहे. 35 वर्षीय केट मिडलटन तिसऱ्यांदा आई होणार आहे.
केट-विल्यमकडे असलेल्या गोड बातमीमुळे राणीसोबतच दोन्ही घरातील नातेवाईकांना अपार आनंद होत आहे. 4 वर्षांचा प्रिन्स जॉर्ज आणि 2 वर्षांची प्रिन्सेस चार्लोट यांना खेळण्यासाठी नवीन भावंड मिळणार आहे. प्रिन्स जॉर्जने याच आठवड्यात लंडनमधील शाळेला जाण्यास सुरुवात केली.
शाही कुटुंबातील प्रेग्नन्सीची बातमी 12 व्या आठवड्यात जाहीर करण्याची प्रथा आहे. मात्र गर्भावस्थेमुळे केटची तब्येत नाजूक असून तिचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे ही बातमी वेळेपूर्वीच घोषित करण्यात आली. केन्सिंग्टन पॅलेसमध्ये केटची काळजी घेतली जात आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















