एक्स्प्लोर
Advertisement
काबूलमधील हॉटेलमध्ये दहशतवादी हल्ला, पाच जणांचा मृत्यू
अमेरिकन दूतावासाने दोन दिवस आधीच दहशतवादी काबुलमधील हॉटेल्सना टार्गेट करु शकतात, असा इशारा दिला होता.
काबुल : अफगाणिस्तानची राजधानी असलेलं काबुल शहर दहशतवादी हल्ल्याने हादरलं आहे. काबुलमधील इंटरकॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये पहाटे काही दहशतवाद्यांनी शिरुन अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
126 जणांची हॉटेलमधून सुखरुप सुटका करण्यात आली असून यामध्ये 41 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. दहशतवादी हल्ल्यात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.
अफगाण स्पेशल फोर्सच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या गोळीबारात हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या किचनमध्ये आग लागली.
या हॉटेलमध्ये बरेच पदरेशी नागरिक येत असतात. विशेष म्हणजे अमेरिकन दूतावासाने दोन दिवस आधीच दहशतवादी काबुलमधील हॉटेल्सना टार्गेट करु शकतात, असा इशारा दिला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
बीड
भारत
Advertisement