![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Japan PM Resigns | जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आजारपणामुळे दिला पदाचा राजीनामा
Japan PM Shinzo Abe Resigns | जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी प्रकृती अस्वास्थामुळे राजीनामा दिला आहे. यांसदर्भातील वृत्त द जपान टाइम्सने दिलं आहे.
![Japan PM Resigns | जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आजारपणामुळे दिला पदाचा राजीनामा Japan PM resigns Japanese Prime Minister Shinzo Abe is set to resign Japan PM Resigns | जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आजारपणामुळे दिला पदाचा राजीनामा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/08/28173753/Shinzo-Abe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Japan PM Shinzo Abe Resigns | जपानचे पंतप्रधान शिंजो आबे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्या आजारपणामुळे आता त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा रंगल्या होत्या. असं बोललं जात होतं की, बऱ्याच दिवसांपासून आजारी असल्यामुळे शिंजो आबे आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊ शकतात. अशातच आता स्वतः शिंजो आबे यांनी स्वतः आपण आजारपणामुळे आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान, जपानचे पंतप्रधान असणाऱ्या शिंजो आबे यांना गेल्या आठवड्यात दोन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
द जपान टाइम्सने यांसदर्भातील वृत्त दिलं आहे. तसेच शिंजो आबे यांनी आजारपणामुळे जपानच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं आहे. काही दिवसांपासून शिंजो आबे राजीनामा देऊ शकतात अशा चर्चा रंगल्या होत्या. जपानमधील एनएचके टेलिव्हिजन आणि इतर मीडिया रिपोर्टनुसार, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आपल्या आरोग्याच्या अस्वास्थामुळे पंतप्रधान पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचं सांगण्यात येत होतं.
जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात बोलताना सांगितले होते की, 'अद्याप या रिपोर्टवर कोणतंच अधिकृत मत व्यक्त केलं जाऊ शकत नाही. परंतु, असं मानलं जात आहे की, आबे पार्टी मुख्यालयातील उच्च अधिकाऱ्यांना भेटत होते. दरम्यान, शिंजो आबे यांनी 2007 मध्येही आपल्या आजारपणामुळे आपल्या पहिल्या कार्यकाळात पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता.
दरम्यान, गेल्या सोमवारी शिंजो आबे यांनी पंतप्रधान कार्यकाळाची 8 वर्ष पूर्ण केली आहेत. तसेच जपानमधील सत्ताधारी पक्ष सातत्याने सांगत होतं की, शिंजो आबे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तसेच त्यांनी शिंजो आबे राजीनामा देणार असल्याचं वृत्त एक अफवा असल्याचं सांगितलं होतं. तसेच पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये शिंजो आबे यांचा कार्यकाळ पूर्ण होणार होता. परंतु, आता शिंजो यांनी स्वतः राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)